Skin Health : त्वचा नॉर्मल असेल तर कधीच काही त्रास होत नाही किंवा त्वचेत वेगळेपणा जाणवत नाही. पण जेव्हा त्वचेत काही बदल होतात किंवा एखादी समस्या होते तेव्हा मात्र चिंतेची बाब असू शकते. कारण शरीरात काहीही गडबड झाली तर त्याचा प्रभाव त्वचेवर दिसून येतो. बऱ्याचदा आपण पाहिलं असेल की, काही लोकांची त्वचा इतकी नाजूक असते की बोटानं दाबली तरी आत जाते. जर तुमच्यासोबतही असं होत असेल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. अशात हे कोणत्या आजाराचं लक्षण आहे हे समजून घेऊ.
का होते त्वचा नरम?
स्किन एक्सपर्ट डॉ. रमेश शर्मा यांनी abplive.com शी बोलताना सांगितलं की, पायाची त्वचा फोमसारखी किंवा स्पंजसारखी आत जाणं सामान्य बाब नाही. यात त्वचेचा लवचिकपणा जातो आणि दाबल्यावर खड्डा पडतो. हा खड्डा वेळ तसाच राहतो आणि नंतर नॉर्मल होतो. या स्थितीला एडिमा किंवा लिम्फेडेमा म्हटलं जातं. पण सोबतच हृदयरोग, किडनीचे आजार किंवा स्किनसंबंधी आजाराचाही यातून संकेत मिळतो. तसेच पायांवर सूज, जडपणा किंवा वेदना यांसारखी लक्षणं सुद्धा दिसतात. जर ही लक्षणं पुन्हा पुन्हा दिसत असतील किंवा जास्त दिवस टिकून राहत असतील तर वेळीच डॉक्टरांना भेटा.
कोणत्या आजाराचं लक्षण
एडिमा (Edema)
एडिमा ही समस्या शरीराच्या टिशूजमध्ये अधिक फ्लूइड जमा झाल्यावर होते. ज्यामुळे त्वचेवर सूज येते. या सूजलेल्या त्वचेवर दाबल्यास खड्डा पडतो, ज्याल पिटिंग एडिमा म्हटलं जातं. या संबंध हृदय, किडनी किंवा लिव्हरच्या समस्येसोबत असतो. डॉ. शर्मा यांच्यानुसार, पिटिंग एडिमानं हार्ट फेलिअर, क्रॉनिक किडनी डिजीज किंवा लिव्हर सिरोसिसची माहिती मिळते. जर पायाची त्वचा दाबल्यावर २ ते ३ सेकंद खड्डा राहत असेल तर स्थिती गंभीर आहे. वेळीच टेस्ट करून योग्य ते उपचार घ्यावेत.
लिम्फेडेमा (Lymphedema)
लिम्फेडेमा ही समस्या लिम्पॅटिक सिस्टीम योग्यपणे काम करत नसेल तेव्हा होते. त्यामुळे लिम्फ फ्लूइड पायांमध्ये जमा होतं. ही स्थिती कॅन्सरचा उपचार, सर्जरी किंवा जन्मजात कारणांमुळे होऊ शकते. लिम्फेडेमामध्ये त्वचा जाड आणि आत घुसलेली असते. यात त्वचा फोमसारखी वाटते. कारण फ्लूइड त्वचेच्या खाली जमा असतं.
डीप व्हेन थ्रोम्बोसिस (Deep Vein Thrombosis - DVT)
डीप व्हेन थ्रोम्बोसिस ही एक गंभीर स्थिती आहे. ज्यात पायांच्या नसांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात. या लक्षणांमध्ये पायांवर सूज, वेदना आणि त्वचा आत जाणे यांचा समावेश करता येईल. जर या गाठी फुप्फुसांपर्यंत पोहोचल्या तर स्थिती गंभीर होऊ शकते. ही समस्या जास्त वेळ बसून राहणाऱ्या लोकांमध्ये अधिक होते.
त्वचेसंबंधी समस्या
काही त्वचेसंबंधी आजार जसे की, सोरायसिस किंवा अॅथलीट्स फुटनं स्किन जाड, ड्राय आणि फोमसारखी होऊ शकते. सोरायसिस एक ऑटोइम्यून आजार आहे, जो स्किनच्या कोशिकांचं टर्नओव्हर वाढतो. ज्यामुळे त्वचेचे पोपडे निघतात आणि आत घुसलेली असते.
पोषक तत्वांची कमतरता
व्हिटामिन बी१२ फोलेट किंवा आयर्नची कमतरता स्किन आणि टिशूजच्या संरचनेला प्रभावित करू शकतात. या गोष्टी कमी झाल्यास त्वचा कमजोर होते.