Join us

जगात ‘या' आजाराने बहुसंख्य लोकांचं जगणं मुश्किल; नाही म्हणालात तरी, तुम्हालाही तोच आजार असू शकतो..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 13:19 IST

Health Tips : जगभरातील लोक वेगानं वेगवेगळ्या गंभीर आजारांचे शिकार होत आहेत. ज्यात हार्ट अ‍ॅटॅकनं जीव जाणाऱ्यांची संख्या सगळ्यात जास्त आहे.

Health Tips : जगाची लोकसंख्या खूप वेगानं वाढत चालली आहे. हा एक मोठा चिंतेचा विषय असून लोकसंख्या कंट्रोल कशी ठेवता येईल यावर जोर दिला जात आहे. भारत जगात सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश बनला आहे. पण जेवढं लोकसंख्या वाढण्याचं प्रमाण आहे, तेवढ्या मूलभूत सुविधा मात्र मिळत नाहीत. जगभरातील लोक वेगानं वेगवेगळ्या गंभीर आजारांचे शिकार होत आहेत. ज्यात हार्ट अ‍ॅटॅकनं जीव जाणाऱ्यांची संख्या सगळ्यात जास्त आहे. जगभरातील एक मोठा वर्ग हृदयरोगांनी ग्रस्त आहे. 

हार्ट अ‍ॅटॅकचे शिकार जास्त

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या एका रिपोर्टनुसार, मृत्यूच्या सगळ्यात जास्त कारणांमध्ये हृदयाचे वेगवेगळे आजार आहेत. इस्केमिक हार्ट डिजीज आणि हृदयासंबंधी आजारांमध्ये हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोकसारख्या आजारांचा समावेश आहे. २०२१ च्या डब्ल्यूएचओच्या आकडेवारीवर नजर टाकली तर हृदयरोगांमुळे मरणाऱ्यांची संख्या ३९ मिलियन आणि जगभरात होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण ५७ टक्के इतकं आहे. 

१० सगळ्यात घातक आजार

सगळ्यात घातक आजारांमध्ये दुसऱ्या नंबरवर क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिजीज (COPD) आणि त्यानंतर श्वसन तंत्रामध्ये इन्फेक्शन खासकरून लोवहर रेस्पेरेटरी इन्फेक्शनचा धोका वाढतो. तेच पूर्ण जगात वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सरही वेगानं वाढत आहेत. ज्यात फुप्फुसं, ट्रेकिआ आणि ब्रोन्कस कॅन्सरचा धोका अधिक आहे.

डायबिटीसचे शिकार तरूण

आजकाल तरूण मंडळी डायबिटीसचे जास्त शिकार होत आहेत. चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्यामुळे जगातील मोठा वर्ग लठ्ठपणा आणि डायबिटीसचा शिकार होत आहे. अल्झायमर आणि डिमेंशियाचा धोकाही वाढत आहे. तसेच आठवड्या नंबरवर किडनीसंबंधी आजार आणि दहाव्या नंबरवर टीबीचे रूग्ण आहेत.

टॅग्स : आरोग्यजागतिक आरोग्य संघटनाहेल्थ टिप्सहृदयविकाराचा झटका