कित्येक जणांचं काम सध्या अशा पद्धतीचं झालं आहे की त्यांना सलग ८ ते ९ तास एकाच जागी बसून काम करावं लागतं. सतत त्यांचे डोळे लॅपटॉप, कॉम्प्युटर अशा स्क्रिनवर स्थिरावलेले असतात. त्यामुळे दिवसातले कित्येक तास ते एकाच जागी एकाच अवस्थेत बसलेले असतात. ऑफिसचा वेळ तर एका जागी बसून काम करावेच लागते, पण जाण्यायेण्यातही बराच वेळ लागतो. एवढा जास्त वेळ जर तुमचं सलग सिटिंग होत असेल तर त्याचा तुमच्या तब्येतीवर वाईट परिणाम होऊ लागतो. त्यामुळेच तर हल्ली रोज ८ ते ९ तास डेस्क जॉब करणाऱ्यांना DVT या आजाराचा धोका वाढला आहे. हा आजार नेमका कोणता आणि त्याची लक्षणं काय हे पाहुया...(people doing desk job are suffering from DVT health issues)
डेस्क जॉब करणाऱ्यांना DVT आजाराचा धोका
डीव्हीटी हा आजार म्हणजेच डीप व्हेन थ्रोंबोसिस. हा आजार सध्या डेस्क जॉब करणाऱ्या लोकांमध्ये खूप वाढला आहे. डॉ. सुजीत नारायण यांनी दैनिक जागरणला दिलेल्या माहितीनुसार या आजारामध्ये थेट आपल्या पायांवर परिणाम होत जातो.
मुलांचे केस कमी वयातच पांढरे होऊ लागले? ५ गोष्टी तातडीने बदला- केस अकाली पांढरे होणं थांबेल
एकाच जागी बसून असल्याने पायांची, शरीराची म्हणावी तशी हालचाल होत नाही. त्यामुळे मग पायांच्या नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार व्हायला लागतात. त्या संपूर्ण शरीरातही पसरू शकतात. जेव्हा रक्तवाहिन्यांद्वारे या गुठळ्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचतात तेव्हा ते जीवघेणंही ठरू शकतं. वैद्यकीय भाषेत यालाच पल्मोनरी एम्बोलिजम असं म्हणतात.
DVT चा त्रास होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?
१. हा त्रास आपल्याला होऊ द्यायचा नसेल तर सगळ्यात आधी ही गोष्ट लक्षात ठेवा की दर एका तासाला थोडा ब्रेक घ्या. तुमच्या जागेवरून उठा आणि ५ मिनिटे चालून पाय मोकळे करा. यामुळे पायाचे स्नायू आखडून जात नाहीत.
जुन्या शिफॉन, जॉर्जेट साड्यांचे शिवा स्टायलिश फ्रॉक, स्वस्तात मस्त कलेक्शन- पाहा ८ सुंदर पॅटर्न्स
२. शरीरात पाणी कमी झालं की रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढतं. बऱ्याचदा काही लोक कामाच्या नादात पाणी पिणंही विसरून जातात. हे टाळायला हवं. अगदी प्रत्येक तासाला पाणी प्यायलाच हवं. पाणी पिणं लक्षात राहात नसेल तर आलार्म सेट करा आणि पाणी प्या.
३. एकावर एक पाय ठेवून म्हणजेच पाय क्रॉस करून बसू नका. बसल्या बसल्या पाय गुडघ्यातून वर उचलणे, तळपाय गोलाकार हलवणे अशा पायाच्या काहीतरी हालचाली चालू ठेवा.
Web Summary : Prolonged sitting in desk jobs increases DVT risk. Inactivity causes blood clots, potentially life-threatening if reaching the lungs. Take hourly breaks, hydrate regularly, and avoid crossing legs to prevent DVT.
Web Summary : डेस्क जॉब में लंबे समय तक बैठे रहने से डीवीटी का खतरा बढ़ता है। निष्क्रियता से रक्त के थक्के बनते हैं, जो फेफड़ों तक पहुंचने पर जानलेवा हो सकते हैं। डीवीटी से बचने के लिए हर घंटे ब्रेक लें, नियमित रूप से पानी पिएं और पैरों को क्रॉस करके बैठने से बचें।