Join us

'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 15:37 IST

Ozempic Teeth : कोणत्याही औषधाचे काही संभाव्य दुष्परिणाम असतात. असाच आता या औषधाचा देखील दुष्परिणाम समोर आला आहे

ओझेम्पिक हा अलिकडच्या काळात सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे. सेमाग्लुटाइड हे औषध टाइप २ मधुमेहावर उपचार करण्यासाठी सर्वाधिक वापरलं जातं, मात्र गेल्या काही वर्षांत वजन कमी करण्यासाठी याचा वापर केला जात असल्याने  त्याची लोकप्रियता वाढली आहे. अनेक सेलिब्रिटींनी देखील याबाबत सांगितलं आहे. त्यामुळे त्याचा वापर हा आता नॉर्मल झाला आहे. 

कोणत्याही औषधाचे काही संभाव्य दुष्परिणाम असतात. असाच आता या औषधाचा देखील दुष्परिणाम समोर आला आहे. "ओझेम्पिक फेस" आणि "ओझेम्पिक बट" प्रमाणेच आता "ओझेम्पिक टीथ" दिसून येत आहे. म्हणजेच हे औषध घेतल्यानंतर तुमच्या दातांवर नकारात्मक परिणाम पाहायला मिळतो. यामुळे आता चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. 

ओझेम्पिक टीथ म्हणजे काय? 

ओझेम्पिक टीथ म्हणजे GLP-1 घेतल्याने दातांवर त्याचा वाईट परिणाम होतो. इन्ना चेर्न यांनी दिलेल्या माहितीनुसार, "GLP-1 औषधांमुळे झेरोस्टोमिया म्हणजेच तोंड सुकतं तसेच तोंडाला वास येतो, दात किडतात, हिरड्यांना सूज येते. याव्यतिरिक्त दाताशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतोत."

"आपण पाहत असलेली आणखी एक गोष्ट म्हणजे यापैकी काही लोकांना GLP-1 मुळे मळमळ होते. जर ते जास्त वेळा उलट्या करत असतील तर त्यामुळे इनॅमलची झीज देखील होऊ शकते" असं बेन विंटर्स यांनी म्हटलं आहे. 

"लक्षात घेण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे औषधांच्या लेबलवर असं काही होईल याबाबत काहीही लिहिलेलं नाही, कारण ही औषधं नवीन आहेत, परंतु ऑनलाईन बरेच लोक याबद्दल बोलत आहेत आणि डेंटीस्टने देखील हे पाहिल्याचं" डॉ. विंटर्स यांनी सांगितलं.

कशामुळे होतात ओझेम्पिक टीथ?

GLP-1 औषधं लाळेचं उत्पादन कमी करतात, भूक आणि तहान कमी होते. ज्यामुळे नंतर तोंड सुकतं. पोटात एसिड तयार होतं, ज्यामुळे मळमळ, उलट्या होतात असं डॉ. चेर्न यांनी म्हटलं आहे. 

लाळ ही दातांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असते, कारण खाद्यपदार्थांचे कण अडकून राहिल्यास ते काढून टाकण्यास मदत करते. तोंडामध्ये बॅक्टेरियामुळे निर्माण झालेलं एसिड कमी करते. आवश्यक मिनरल्स असतात, ज्यामुळे दाताचं इनेमल मजबूत होतो. पण जेव्हा लाळेचं प्रमाण कमी होतं तेव्हा मात्र दात खराब होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स