आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) संदर्भात 'फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ रिओ डी जानेरो' च्या नवीन अभ्यासानुसार, चॅट जीपीटी (ChatGPT) सारख्या एआय टूल्सचा वापर तुमच्या मेंदूवर परिणाम करू शकतो. प्रत्येक गोष्टीसाठी एआय टूल्सवर अवलंबून राहिल्यामुळे मेंदूची लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होऊ शकते. याशिवाय तुमची कल्पक विचारसरणी देखील मर्यादित होऊ शकते.
या रिसर्चमध्ये असं दिसून आलं आहे की, जे विद्यार्थी पूर्णपणे चॅट जीपीटीवर अवलंबून होते, त्यांच्या मेंदूची सक्रियता सर्वात कमी होती. चॅट जीपीटी वापरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत, तंत्रज्ञानाशिवाय स्वतः काम करणाऱ्या मुलांचा मेंदू जास्त सक्रिय होता.
चॅट जीपीटीसारखी एआय टूल्स आपल्या मदतीसाठी आहेत, परंतु त्यांच्यावर वाढतं अवलंबित्व आपल्या स्मरणशक्तीला आणि सर्जनशीलतेला हानी पोहोचवत आहे. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांसाठी हे धोकादायक ठरू शकतं. अभ्यासादरम्यान मुलांची विचार करण्याची क्षमता विकसित होणं आवश्यक असतं, मात्र अशा वेळी चॅट जीपीटीच्या वापरामुळे ही क्षमता कमी होते.
कार्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटी आणि मायक्रोसॉफ्टला असं आढळून आलं आहे की, जर एखादी व्यक्ती एआयचा गरजेपेक्षा जास्त वापर करत असेल किंवा प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी एआयवर अवलंबून असेल, तर त्या व्यक्तीची समस्या सो़डवण्याची क्षमता कमकुवत होऊ शकते.
ब्रिटनमधील शालेय मुलांवर एक अभ्यास करण्यात आला, जो 'ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस'मध्ये प्रकाशित झाला. या रिसर्चमध्ये असं आढळलं की, दर १० पैकी ६ विद्यार्थ्यांना असं वाटलं की एआय टूल्सनी त्यांच्या कामाशी संबंधित क्षमतेवर परिणाम केला आहे. मात्र, एआयच्या मदतीने मुलांचं काम सोपं झालं आहे, हेही तितकंच खरं आहे.
Web Summary : AI tools like ChatGPT may impair memory and creative thinking, says a new study. Over-reliance reduces brain activity, especially in students, hindering problem-solving abilities. Use with caution.
Web Summary : एक नए अध्ययन के अनुसार, ChatGPT जैसे AI उपकरण स्मृति और रचनात्मक सोच को कमजोर कर सकते हैं। अत्यधिक निर्भरता मस्तिष्क की सक्रियता को कम करती है, खासकर छात्रों में, जिससे समस्या-समाधान क्षमता बाधित होती है। सावधानी से प्रयोग करें।