आपल्या वागण्याचा आपल्या आवडी निवडीचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. तसेच आपल्या स्वास्थ्यावरही परिणाम होत असतो. (Our 5 habits are slowing down our brain, increasing the risk of forgetfulness and brain fog! Check if you have those habits too)त्यामुळे चांगला आहार घेणे गरजेचे असते. व्यायाम करणे गरजेचे असते. या गोष्टी आपण जाणून आहोत. मात्र आपल्या काही सवयी अशा असतात ज्या आपल्या मेंदूवर परिणाम करतात. आपल्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करतात. डॉ. गुडडीड या साईटवर काही सवयींविषयी माहिती उपलब्ध आहेत. (Our 5 habits are slowing down our brain, increasing the risk of forgetfulness and brain fog! Check if you have those habits too)या सवयी फार कॉमन आहेत. पाहा तुम्हीही असेच वागता का?
१. इंट्रोवर्ट हा शब्द तुम्ही नक्कीच ऐकला असले. आजकाल अनेक लोक स्वतःला इंट्रोवर्ट म्हणतात. इंट्रोवर्ट म्हणजे असा माणूस ज्याला एकट राहायला आवडते. त्याला आजूबाजूला माणसं नको असतात. काही ठराविक लोकांशी तो मोजकंच बोलतो. बाकी स्वतःच्यातच दंग असतो. सामाजिक गोष्टींपासून त्यांना लांब राहायलाच आवडते. ज्याला आपण एकलकोंडेपणा म्हणतो तो काही लोकांना हवाहवासा वाटतो. आपण लहानपणी शाळेत शिकलो आहोत की माणूस हा सामाजिक प्राणी आहे. एका माणसाला इतर माणसांची गरज असते. जर लोकांशी संपर्क न ठेवता तुम्ही स्वतःला कोंढून बसता तर ती सवय बदला. एकलकोंडेपणाचा मेंदूवर परिणाम होतो.
२. काहींना काळोख फार आवडतो. उजेड असलेला त्यांना चालत नाही. घरातच बसून राहायला आवडते. उजेडात जायला आवडत नाही. ही सवय चांगली नाही. सूर्यप्रकाशात जाणे जसे शरीरासाठी गरजेचे असते तसेच मानसिक स्वास्थासाठीही असते. त्यामुळे सतत काळोख करुन राहू नका. उजेडात राहा. दिवसभर घरात बसू नका. बाहेरही फेरफटका मारा.
३. गाणी ऐकायला तर सगळ्यांनाच आवडते. आजकाल अनेक प्रकारची यंत्रे मिळतात. गाणी ऐकण्यासाठी हेडफोन्स तसेच इतरही काही प्रकार बाजारात मिळतात. जवळपास सगळेच ही उपकरणे वापरतात. जोरात गाणी ऐकताना मोबाइलवर एक सुचना येते यापेक्षा जास्त आवाज कानासाठी हानिकारक आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन आपण गाणी ऐकतोच. मात्र अति आवाजात गाणी ऐकणे कानांसाठीच नाही तर मेंदूसाठीही वाईट असते.
४. आजकाल नाईट लाईफ अगदीच कॉमन गोष्ट आहे. रात्रीची वेळ मेंदूला शांतता देण्याची असते. मात्र तेव्हाही आपण जागे राहतो. ज्यामुळे मेंदूला आराम मिळत नाही. झोप कमी होतेच मात्र रात्री जागरण करताना आपण भरपूर अरवटचरवट पदार्थ खातो. असे पदार्थ खाणे मेंदूसाठी धोक्याचे ठरु शकते.
५. झोपण्यापूर्वी आपण रिल्स स्क्रोल करतो. तसेच चॅट करतो. ही सवय मेंदूसाठी चांगली नाही. झोपण्यापूर्वी मोबाइल वापरू नका.