ओरी तर तुम्हाला माहितीच आहे. तोच तो जो अनेक सेलिब्रिटींच्या अंगावर हात ठेवून फोटो काढतो. त्यानं म्हणे त्यांचं लक वाढते. तो पेज थ्री जगात सर्वत्र असतो. तर त्याच ओरीने अलिकडेच सांगितलं की त्याला IBSचा त्रास आहे. (Orry said, "My stomach doesn't clear up either, I have IBS every day!" What exactly is this disease?)तेच म्हणजे त्याचं पोट रोजच्या रोज नीट साफ होत नाही. त्याला त्रास होतो. आता एवढा मोठा फेमस ओरी असं सांगतो म्हणजे चर्चा तर होणारच. तर काय असतं हे IBS? आजकाल अनेकांनाच हा त्रास छळतो आहे.
ओरहान अवत्रामणी, ज्याला सर्वजण 'ओरी' म्हणून ओळखतात. त्याने IBS चा विषय एका पॉडकास्ट मध्ये काढला. ओरी बॉलिवूडच्या पार्टी आणि सोशल मीडियावर सतत चर्चेत असलेला चेहरा आहे. तो अभिनेता नसला तरी जान्हवी कपूर, सारा अली खान, अनन्या पांडे, न्यासा देवगण यांसारख्या स्टार्सचा जवळचा मित्र आहे. त्यामुळे तो अनेकदा फिल्म, फॅशन इव्हेंट्स आणि सोशल मीडियावर दिसतो. तो एक सोशल मिडिया फिगर आहे.
ओरीने फराह खानसोबतच्या एका पॉडकास्टमध्ये सांगितले की त्याला IBS (Irritable Bowel Syndrome) हा त्रास आहे. लोकं सहसा अशा त्रासांबद्दल सगळ्यांसमोर बोलत नाहीत मात्र ओरीने हे खुलेपणाने सांगून आरोग्य विषयांवर बोलण्याचं धाडस दाखवलं. त्यामुळे अनेक लोकांनी त्याचं कौतुक केलं. IBS चा संबंध थेट पोटाशी असतो. पचनाशी आणि पोट साफ होण्याची संबंध असतो या त्रासाचा.
हा त्रास पचनसंस्थेशी संबंधित असतो आणि जगभरातील अनेक लोकांना होतो. IBS मध्ये पोटातील स्नायू खूप संवेदनशील होतात. त्यामुळे अन्न पचताना त्रास होतो आणि पोटात दुखणे, पोट सारखे फुगते, गॅस, वारंवार शौचास जाणे, बद्धकोष्ठता किंवा अतिसार अशी लक्षणे दिसतात. ऐकायला जरी सामान्य वाटला तरी, रोजच्या जीवनावर मोठा परिणाम करतो. अनेकदा ताणतणाव, चुकीचा आहार, झोपेची कमतरता आणि अस्थिर जीवनशैली यामुळे हा त्रास वाढतो. ओरीने फराहच्या शोवर सांगितल्याप्रमाणे त्याला काहीही खाल्ले तरी त्याचे पोट खराब होते. त्याला फार मोजकेच अन्न पदार्थ पचतात. तो जास्त मसाला खाऊ शकत नाही. त्याला लगेच त्रास होतो.