Heart Disease In Children : अलिकडे हृदयरोगांचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. त्यासंबंधी वेगवेगळी संशोधनंही नेहमीच समोर येत असतात. तरूण वयातच लोक हृदयरोगांचे शिकार होत आहेत. हार्ट अॅटॅक येऊन त्यांचा जीव जात आहे. अशात आता केवळ तरूणच नाही तर लहान मुलांमध्येही हृदयरोगांचं प्रमाण वाढत असल्याचा खुलासा एका रिपोर्टमधून झाला आहे. देशभरात वाढत चाललेलं प्रदूषण, प्रोसेस्ड फूड आणि स्क्रीनटाइममुळे आजची मुलं लहान वयातच गंभीर आजारांच्या विळख्यात सापडत आहेत.
ICMR च्या ताज्या अभ्यासानुसार, शहरी भागातील ४०% मुलांमध्ये ‘लिपिड डिसऑर्डर’ म्हणजेच रक्तातील फॅट्स (फॅटी अॅसिड्स, ट्रायग्लिसराइड्स, एलडीएल) वाढलेले आहेत.
सामान्यपणे दिल्लीला प्रदूषणाची राजधानी म्हटलं जातं. पण आता दिल्ली ‘हायपरटेन्शन कॅपिटल’ बनली आहे. फक्त ५ ते ९ वयोगटातील मुलांमध्येच फॅट्सचे प्रमाण धोकादायकरीत्या वाढले आहे. अभ्यासात आढळले की, पश्चिम बंगालमध्ये ६७% मुले हाय ट्रायग्लिसराइड्सची शिकार आहेत, आसाममध्ये ५७%, आणि जम्मू-काश्मीरमध्ये ५०% मुलांमध्येही हा धोका आहे.
WHO नं या स्थितीला “Silent Epidemic” म्हटलं आहे. कारण ही समस्या अनेकदा लक्षणांशिवाय वाढत जाते आणि नंतर अचानक स्ट्रोक किंवा हार्ट अॅटॅकचा धोका निर्माण करते.
कमी वयात हाय बीपी आणि फॅट्स वाढण्याची कारणं
- जंक फूड, सॉफ्ट ड्रिंक्स, फ्रेंच फ्राईज, पिझ्झा
- फिजिकल अॅक्टिविटी कमी आणि जास्त स्क्रीन टाइम
- झोप कमी घेणं
- स्ट्रेस आणि असंतुलित जीवनशैली
डॉ. आर. एस. सोनी, कार्डिओलॉजिस्ट, AIIMS दिल्ली सांगतात की, “जर लहानपणापासूनच मुलांच्या रक्तात ट्रायग्लिसराइड्स आणि एलडीएल वाढले म्हणजे कोलेस्टेरॉल वाढलं तर तर वयाच्या २०-२५ पर्यंत हार्ट अॅटॅकचा धोका ५ पट वाढतो.”
ब्लड प्रेशरची लक्षण
डोकेदुखी, छातीत वेदना, चिडचिडपणा, श्वास घेण्यास समस्या, नसांमध्ये झिणझिण्या आणि चक्कर येणे या गोष्टी ब्लड प्रेशरचे संकेत असू शकतात. हाय ब्लड प्रेशरमुळे रेटिना डॅमेज, नजर कमजोर होणे, स्ट्रोक, स्मरणशक्ती कमजोर होणे, दम लागणे, हार्ट अॅटॅक, हार्ट फेलिअर आणि किडनी डॅमेजसारख्या गोष्टींचा धोका वाढतो.
ब्लड प्रेशर किती असावं?
नॉर्मल बीपी: 120/80
हाय बीपी: 140/90 पेक्षा जास्त
लो बीपी: 90/60 पेक्षा कमी
बीपी आणि हार्टच्या आजारांपासून बचाव
- संतुलित आणि कमी तेलकट आहार घ्या
- दररोज ३० मिनिटे वॉकिंग किंवा एक्सरसाइज करा
- मीठ कमी खावे, दिवसभरात ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये.
- स्ट्रेस कमी करा आणि पुरेशी झोप घ्या