सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपण सगळेच वेळेच्या अभावामुळे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतो. दिवसभर काम, मोबाईल, स्क्रीन आणि ताणतणावामध्ये अडकलेला दिवस हा रात्रीच्या जेवणावर येऊन थांबतो.(After dinner habits for digestion) अनेकांना उशिरा जेवण्याची सवय असते. घाईघाईत खाल्ल्याने घशात देखील अडकते. मसालेदार पदार्थ, जड पदार्थांचा थेट आपल्या पचनसंस्थेवर परिणाम होतो.(Night routine for better digestion) जेवण झाल्यानंतर अनेकांना पोट जड वाटण्याची, गॅस, आम्लपित्त, अपचन, बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवू लागतो. या तक्रारी हळूहळू वाढतात ज्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटते. झोपही शांत लागत नाही.
आपल्यापैकी अनेकजण रात्री जड अन्नपदार्थ खातात आणि लगेच झोपायला जातात.(Constipation relief tips) ज्यामुळे पचनाच्या समस्या वाढतात. या चुकीच्या सवयींमुळे, गॅस, आम्लता, पोटात जडपणाची समस्या, निद्रानाश सुरु होतो. पण आपण रोजची ही सवय बदलली तर झोपेच्या आणि पोटाच्या सगळ्या तक्रारी दूर होतील.
१५ मिनिटांत करा ढाबा-स्टाईल पंजाबी दाल तडका, 'अशी' द्या फोडणी, चव इतकी जबरदस्त सगळे आवडीने खातील
1. पोषणतज्ज्ञ लिना महाजन म्हणतात. जेवणानंतर रोज फक्त पाच मिनिटे वज्रासनात बसा. रात्रीच्या वेळी आपली पचनक्रिया मंदावते. ज्यामुळे अन्नाचे योग्य पचन होत नाही. त्यासाठी फक्त ५ मिनिटे वज्रासनात बसा. ज्यामुळे अन्न लवकर पचण्यास मदत होईल. अन्न योग्यरित्या पचन झाल्यास शरीर हलके वाटते आणि रात्री शांत झोप लागते.
2. वज्रासनात बसल्याने आपल्या पोटातील आम्ल वरच्या दिशेने वाढण्यापासून रोखते. यामुळे आम्लपित्त आणि छातीत जळजळ कमी होते. पोटातील गॅस, पोटफुगी आणि जडपणा देखील कमी होतो. जर आपण हा योगासन नियमितपणे केला तर पोटाच्या अनेक समस्यांपासून आपली सुटका होईल.
3. वज्रासन करण्यासाठी आपल्याला जमिनीवर चटई पसरवावी लागेल. त्यानंतर गुडघे वाकवून बसा. आपली पाठ आणि डोके सरळ ठेवा. आपले तळवे गुडघ्यांवर ठेवा. या स्थितीत ५ मिनिटे बसा आणि खोल श्वास घ्या. यामुळे अन्न लवकर पचण्यास मदत होईल.
