Join us

पावसाळ्यात सर्दी-खोकला सतत होतो? लवंग आणि वेलचीचा ‘हा’ उपाय-पावसाळ्यात आजारपण टळेल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2025 15:44 IST

old Traditional Remedy for Cough and Cold : Natural Remedies for Cough and Cold : Simple Home Remedies for Cough, Cold & Sore Throat : 2 Spices That Can Help Beat Cough & Cold During Monsoon Season : पावसाळ्यात बरेचदा भरपूर सर्दी-कफ-खोकला होतोच, अशावेळी करा हा आजीबाईच्या बटव्यातला असरदार उपाय...

पावसाळा आला की सर्दी, खोकला आणि कफाचा त्रास हमखास सुरू होतो. घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पावसाळ्यात किमान एकदा तरी सर्दी, कफ, खोकला होतो. हवेतली ओलावा आणि बदलते तापमान यामुळे प्रतिकारशक्ती कमजोर होते आणि लगेच हे लहान - मोठे आजार डोकं (old Traditional Remedy for Cough and Cold) वर काढतात. या दिवसांत वातावरणातील गारवा आणि दमटपणा यामुळे श्वसनाचे (Natural Remedies for Cough and Cold) विकार पटकन होतात. जेव्हा आपल्याला हा त्रास होतो तेव्हा सतत वाहणारे नाक, खोकून बेजार झालेला घसा, बाहेर न निघणारा हट्टी कफ ( Simple Home Remedies for Cough, Cold & Sore Throat) यामुळे अक्षरशः नकोसे वाटू लागते. सर्दी, खोकला सुरु झाला की जायचे नावाचं घेत नाही. अशावेळी, आपण या सर्दी - खोकल्यावर काही घरगुती व नैसर्गिक प्राथमिक उपचार करुन पाहतो(2 Spices That Can Help Beat Cough & Cold During Monsoon Season).

पावसाळ्यात वरचेवर सतत होणाऱ्या सर्दी, खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी स्वयंपाकघरातील मसाल्यांच्या डब्यांतील लवंग काड्या व वेलची असरदार ठरते. लवंग आणि वेलची यांचे शक्तिशाली औषधी गुणधर्म सर्दी-कफ दूर करून आराम मिळवून देतात. फक्त योग्य प्रकारे वापर केल्यास पावसाळ्यात तब्येत बिघडण्यापासून स्वतःचा बचाव करता येऊ शकतो. लवंग आणि वेलची या दोन्हींच्या उष्ण गुणधर्मामुळे सर्दी, कफ आणि खोकला लवकर गायब होतो आणि आपण पावसाळ्यातही तंदुरुस्त राहू शकता.

सर्दी, कफ, खोकल्यावर लवंग - वेलची असदार... 

पावसाळ्यात वरचेवर होणारा सर्दी, कफ, खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी प्रत्येकी २ लवंग काड्या आणि वेलची, चमचाभर मध व आल्याचा रस इतकेच साहित्य लागणार आहे. 

सुपरस्टार अभिनेत्रीही चेहऱ्याला लावतात ‘हे’ घरगुती लेप, जाहिरातीतल्या महागड्या क्रिम नाहीतर त्या निवडतात...

हृदय कमजोर होतंय, माझं ऐका म्हणत शरीर सांगतं ७ गोष्टी, उशीर झालाच तर संपलं सगळं!

नेमकं करायचं काय ? 

सगळ्यांतआधी एका चिमट्यात लवंग काड्या व वेलची धरुन गॅसच्या मंद आचेवर थेट गरम करुन घ्यावे. लवंग आणि वेलची यांचा नैसर्गिक रंग बदलून संपूर्णपणे काळा रंग होईपर्यंत व्यवस्थित गरम करून घ्यावे. त्यानंतर चमच्याच्या मदतीने भाजून घेतलेल्या लवंग काड्या आणि वेलची हलकेच दाब देत त्यांची पावडर करुन घ्यावी. यात चमचाभर आल्याचा रस आणि मध घालावे. आता हे सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. हे मिश्रण आपण दिवसभरातून १ ते २ वेळा खाऊ शकतो. यामुळे पावसाळ्यात वारंवार होणाऱ्या सर्दी, कफ, खोकल्याच्या त्रासापासून आराम मिळण्यास मदत होते. 

पावसाळ्यात नाजूक जागी खाज - फंगल इन्फेक्शन होते? ४ टिप्स, योग्य काळजी घ्या, नाहीतर वाढतो त्रास...

हा उपाय कसा आहे असरदार... 

 १. लवंग :- लवंगमधील अँटी-बॅक्टेरियल गुण सर्दी-खोकल्यातील जंतूंना नष्ट करून श्वसनमार्ग मोकळा करतात.

२. वेलची :- कफ पातळ करून श्वसनास मदत करते आणि आवाजातील घरघर कमी करते.

३. आल्याचा रस :- सूज आणि जळजळ कमी करून सर्दी-खोकल्यात लगेच आराम देतो.

४. मध :- घशाला आराम देऊन खोकल्याची तीव्रता कमी करतो आणि प्रतिकारशक्ती वाढवतो.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडीघरगुती उपायपाऊस