Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारं लालचुटूक गोड फळ, रोज खा आणि हृदय ठेवा ठणठणीत

बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारं लालचुटूक गोड फळ, रोज खा आणि हृदय ठेवा ठणठणीत

Cholesterol Remedy: काही हेल्दी गोष्टी खाऊन हृदयाचं आरोग्य सुधारलं जाऊ शकतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 15:02 IST2025-06-20T10:27:31+5:302025-06-20T15:02:04+5:30

Cholesterol Remedy: काही हेल्दी गोष्टी खाऊन हृदयाचं आरोग्य सुधारलं जाऊ शकतं.

Nutritionist told about the best fruit for reduce bad cholesterol | बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारं लालचुटूक गोड फळ, रोज खा आणि हृदय ठेवा ठणठणीत

बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारं लालचुटूक गोड फळ, रोज खा आणि हृदय ठेवा ठणठणीत

Cholesterol Remedy: आजच्या धावपळीच्या जीवनात हृदयासंबंधी वेगवेगळी आजार होणं फारच कॉमन झालं आहे. पूर्वी वयोवृद्ध लोकांनाच हृदयरोग अधिक व्हायचे. पण आजकाल तर तरूण देखील या आजारांनी पीडित होत आहेत. खासकरून हाय कोलेस्टेरॉलची समस्या खूप जास्त वाढत आहे. यामागे खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाइल यांचा ही मुख्य कारणं सांगितली जातात. याच कारणानं अनेक हेल्थ एक्सपर्ट कोलेस्टेरॉल वाढल्यावर आहारात आणि लाइफस्टाइलमध्ये बदल करण्याचा सल्ला देतात. 

कोलेस्टेरॉलच्या रूग्णांसाठी बेस्ट फळ

प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट दीपशिखा जैन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करून या फळाबाबत माहिती दिली आहे. त्यांच्यानुसार, रोज एक डाळिंब खाऊन बॅड कोलेस्टेरॉल बरंच कमी करता येऊ शकतं. तुमच्या शरीरात आधीच कोलेस्टेरॉल वाढलं असेल तर डाळिंबाच्या मदतीनं ते नसांमधून बाहेर काढलं जाऊ शकतं.

कसा मिळतो फायदा?

न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, डाळिंबामध्ये भरपूर अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. जसे की, पॉलिफेनॉल्स आणि अ‍ॅलेजिक अ‍ॅसिड, जे शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. बॅड कोलेस्टेरॉल हळूहळू रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन त्या ब्लॉक करू लागतं. ज्यामुळे हार्ट अ‍ॅटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. अशात डाळिंब ही प्रक्रिया थांबवण्यास मदत करू शकतं.

शोधातूनही खुलासा

दीपशिखा जैन यांच्यासोबतच अनेक शोधांमधूनही हे समोर आलं आहे की, डाळिंब कोलेस्टेरॉलच्या समस्येत प्रभावी ठरतं. डाळिंब नियमित खाल तर हृदयासंबंधी आजार रोखण्यास मदत मिळते. 

कसं खाल?

रोज सकाली आपल्या दिवसाची सुरूवात तुम्ही एक डाळिंब खाऊन करू शकता. पण बाजारात मिळणारे याचे पॅकेटमधील ज्यूस टाळावे. या ज्यूसमध्ये शुगर जास्त असते, ज्यामुळे याचा प्रभाव उलटा पडू शकतो. 

Web Title: Nutritionist told about the best fruit for reduce bad cholesterol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.