Join us

रिमझिम पावसात चहा-भजींवर ताव मारणं ठरू शकतं घातक, मग कधीच खायचे नाहीत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 16:44 IST

Chai and Pakoras : चहा आणि भजी हे कॉम्बिनेशन अनेकांसाठी कॉम्बिनेशन नसून एक भावना आहे. पण यातून मिळणारा आनंद हा तुमच्या आरोग्याशी खेळू शकतो. कसा ते वाचा.

Chai and Pakoras : पावसाला सुरूवात झाली की, लोकांची वेगवेगळ्या आडवीच्या गोष्टी खाण्या-पिण्याचीही चांगली चंगळ सुरू होते. पावसाच्या रिमझिम धारांसोबत भरपूर लोकांना वाफाळलेला कडक चहा आणि गरमागरम भजी खाण्याची हौस असते. हे वाटतंही भारी. पण अनेकांना हे माहीत नसतं की, चिभेचे चोचले पुरवणारं हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. 

असंही म्हणता येईल की, चहा आणि भजी हे कॉम्बिनेशन अनेकांसाठी कॉम्बिनेशन नसून एक भावना आहे. पण यातून मिळणारा आनंद हा तुमच्या आरोग्याशी खेळू शकतो. कसा ते वाचा.

न्यूट्रिशनिस्ट श्वेता जे पांचाल यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी सांगितलं की, चहा आणि भजीचं कॉम्बिनेशननं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात.

का खाऊ नये चहा-भजी?

श्वेता यांच्यानुसार, पावसाळ्यात चहा आणि भजी एकत्र खाल्ल्यास गट हेल्थसंबंधी समस्या होऊ शकतात. तुम्ही सुद्धा अनेकदा अनुभवलं असेल की, चहा आणि भजी खाल्ल्यानंतर सुस्त वाटतं आणि पोट फुगल्यासारखं जाणवतं. 

भजी डीप फ्राय केली जातात आणि यात भरपूर मैदा किंवा बेसन असतं. अशात तुम्ही भजी खाल्ल्यावर अॅसिडिटीची समस्या होऊ शकते. खासकरून जर तुमचं पोट आधीच बिघडलेलं असेल किंवा पचनक्रिया स्लो असेल. दुसरीकडे चहामध्ये भरपूर साखर आणि दूध असतं. यानं डायजेशन स्लो होतं.

वाटू शकतं अस्वस्थ

जेव्हा तुम्ही या दोन्ही एकत्र खाता तेव्हा पोटात गडबड होते. दिवसातील पहिलं फूड असल्यानं बॉडी कन्फ्यूज होते. त्यानंतर पोटात अ‍ॅसिड वाढतं, थकवा जाणवतो आणि अस्वस्थही वाटू लागतं. या समस्या केवळ एक दिवस नाही तर पुढील काही दिवस तुम्हाला जाणवू शकतात.

इम्यूनिटीवर पडतो प्रभाव

या कॉम्बिनेशनचा सगळ्यात जास्त वाईट प्रभाव तुमच्या इम्यूनिटीवर पडतो. आधीच पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती कमजोर झालेली असते, अशात चहा आणि भजी सोबत खाल तर इम्यूनिटी अधिक कमजोर होते. पावसाळ्यात इम्यूनिटी मजबूत असणं फार गरजेचं असतं, जेणेकरून इन्फेक्शन आणि आजारांपासून बचाव करता यावा.

कधीच खाऊ नये का चहा-भजी?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, चहा आणि भजी खाणं तुम्हाला आवडतं, मग कधीच या गोष्टी एकत्र खायच्या नाहीत का? तर न्यूट्रिशनिस्ट याबाबत सांगतात की, नेहमीच जर चहा-भजी खात असाल तर समस्या होतात. तुम्ही अधून-मधून एखादवेळ याचा आनंद घेऊ शकता. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स