Corn Silk Benefits : हिवाळ्यात भुट्टा म्हणजे मका खाण्याची एक वेगळी मजा असते. भाजून लिंबू चोळून, तिखट-मीठ लावलेला भुट्टा डोळ्यांसमोर आला तरी तोंडाला पाणी सुटतं. बरेच लोक हे भाजून किंवा उकडून खातात. याची टेस्ट तर चांगली असतेच सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. पण जास्तीत जास्त लोक मक्याचे धागे कचरा म्हणून फेकतात. याला कॉर्न सिल्कही म्हटलं जातं. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, मक्याचे धागे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. अनेक गंभीर समस्या दूर करण्यास यांची मदत मिळते.
डायटिशिअन श्रेया गोयल यांनी सांगितलं की, मक्याचे धागे कचऱ्यात फेकण्याची चूक कधीही करू नका. कारण यांपासून आरोग्याला अनेक फायदे मिळतात. चीन, तुर्की, अमेरिका आणि यूकेसहीत अनेक ठिकाणी पारंपारिक चिकित्सेमध्ये यांचा वापर केला जातो.
डायटिशिअनने मक्याच्या धाग्यांचं सेवन करण्याची पद्धतही सांगितली आहे. त्यांनी हेही सांगितलं की, गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी यांचं सेवन करू नये. यातून शरीराल कॅल्शिअम, झिंक आणि मिनरल्स मिळतात. लहान मुलांना सुद्धा हे देऊ शकता.
किडनी स्टोनमध्ये फायदेशीर
एक्सपर्टनुसार, कॉर्न सिल्क किडनी स्टोन बाहेर काढण्यासाठीही फायदेशीर आहे. हे एक चांगलं डायरेटिक असतं, जे ब्लोटिंग म्हणजे पोट फुगण्याची समस्या दूर करतं. तसेच मक्याचे धागे पुरूषांच्या प्रोस्टेट हेल्थसाठीही फायदेशीर असतात. सोबतच याने यूटीआय इन्फेक्शनही कमी करता येतं
बीपी आणि शुगरमध्येही फायदेशीर
एक्सपर्टनी सांगितलं की, मक्याच्या धाग्यांचा वापर ब्लड शुगर नॅचरल पद्धतीने कंट्रोल करण्यास केला जाऊ शकतो. तसेच याने बीपीही नॉर्मल राहण्यास मदत मिळते. सोबतच यातील अॅंटी-ऑक्सि़डेंट्स हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवतात.
नॅचरल डिटॉक्स
मक्याच्या धाग्यांपासून ड्रिंक तयार केलं जाऊ शकतं. ज्याला डिटॉक्स वॉटर किंवा कॉर्न सिल्क टी असंही म्हटलं जातं. याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते. यात अॅंटी-इन्फ्लेमेटरी तत्व असतात जे संधिवात आणि सूज कमी करतात.
कसा तयार कराल चहा?
मक्याचे धागे तसेच खाण्याची कोणतीही वेगळी पद्धत नाहीये. तुम्ही याचं सेवन चहाच्या रूपात करू शकता. एका भांड्यात पाणी उकडा आणि त्यात ताजे कॉर्न सिल्क टाका. काही मिनिटे हे उकडू द्या आणि थंड होऊ द्या. काही वेळाने या चहाला भुरका रंग येईल. त्यानंतर हा चहा गाळून घ्या. याची टेस्ट चांगली करण्यासाठी तुम्ही यात लिंबाचा रसही घालू शकता.