Constipation Home Remedies : बद्धकोष्ठता म्हणजे पोट साफ होणं ही एक गंभीर आणि आजकाल जास्तच वाढत चाललेली समस्या आहे. वृद्धांसोबतच तरूण सुद्धा पोट साफ न होण्यानं वैतागलेले आहेत. दिवसातून तीन ते चार वेळाही टॉयलेटला जाऊन पोट साफ होत नसल्यानं वेगवेगळी औषधं घेतली जातात. पण त्यांनी फायदा मिळेलच असं नाही. पोट साफ होत नसेल तर जास्तीत जास्त लोक जोर लावतात. पण जोर लावल्यानं आतड्यांवर दबाव पडण्यासोबतच पाइल्स होण्याची धोकाही वाढतो.
आयुर्वेदात बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यानंतर टॉयेलटमध्ये जोर लावण्याची किंवा जास्त वेळ बसून राहण्याची सुद्धा गरज पडणार नाही. पोटही आरामात साफ होतं. न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी यावर एक सोपा उपाय सांगितला आहे.
पोट साफ होण्याचा उपाय
पोट लगेच साफ होऊन हलकं वाटण्यासाठी तुम्हाला १ चमचा तूप, अर्धा चमचा मीठ आणि एक कप पाणी लागेल. तर १ ते दीड कप कोमट पाणी घ्या. त्यात एक चमचा तूप टाका. त्यात अर्धा चमचा मीठ टाकून चांगलं मिक्स करा. आता हे एक एक घोट घेत सेवन करा.
न्यूट्रिशनिस्टने सांगितलं की, हा उपाय रात्री जेवणानंतर १ तासांनी करणं अधिक फायदेशीर ठरेल. याने अन्न पचन होण्यास मदत मिलेल आणि आतड्याही सैल होतील. जेव्हा तुम्ही सकाळी टॉयलेटमध्ये जाल तर जास्त वेळ बसून राहण्याची गरज पडणार नाही.
तूप ठरतं फायदेशीर
तुपामुळे शरीरातील आतड्या सैल आणि चोपड्या होतात. ल्यूब्रिकेशननंतर पोट साफ होण्यात आतड्यांना जास्त मेहनत करावी लागत नाही. यामुळेच हिवाळ्यात भारतात जेवणात तूप खाण्याची परंपरा आहे.
कोमट पाण्याचे फायदे
शौच कोरडी आणि टणक असेल तर पोट साफ होण्यास समस्या होते. ड्राय स्टूल बाहेर येत असताना गुदद्वारातील स्नायूंना इजा होऊ शकते. यानं इन्फेक्शन किंवा पाइल्सचाही धोका वाढतो. गरम पाण्यानं शौच मुलायम होतं आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय बाहेर येतं.