Fatty Liver Home Remedy : जगभरात कमी वयातच असे आजार होत आहेत, ज्याबाबत आधी फार कुणी ऐकलंही नसेल. फॅटी लिव्हर ही लाइफस्टाईलसंबंधी दिवसेंदिवस वाढत चाललेली गंभीर समस्या आहे. नेहमीच तेलकट, मसालेदार पदार्थ खात असाल आणि सुस्त लाइफस्टाईल असेल तर तुम्हाला फॅटी लिव्हरची समस्या होऊ शकते. लिव्हरवर जास्त प्रमाणात फॅट जमा झाल्यानं लिव्हर कामकाज प्रभावित होतं. सोबतच शरीरात इतरही आजार घर करू लागतात.
मद्यसेवनासोबतच लठ्ठपणा, हाय बॅड कोलेस्टेरॉल आणि टाइप २ डायबिटीस असलेल्यांना फॅटी लिव्हरचा धोका अधिक असतो. केवळ दारू पिऊनच ही समस्या होते असं नाही. दारू न पिताही चुकीच्या लाइफस्टाईलमुळंही फॅटी लिव्हरची समस्या होऊ शकते. याला नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर असं म्हणतात.
फॅटी लिव्हर ही लाइफस्टाईलसंबंधी समस्या आहे. त्यामुळे ही समस्या हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करून दूर करता येऊ शकते. त्याशिवाय काही असे घरगुती उपायही आहेत, ज्यांच्या मदतीनं ही समस्या दूर करता येऊ शकते. असाच एक उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
फॅटी लिव्हर दूर करणारा उपाय
Nutritionist Shweta Shah यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअरर करत या उपायाबाबत सांगितलं आहे. या उपायानं लिव्हर डिटॉक्स होईल आणि त्याची काम करण्याची क्षमताही वाढेल. यासाठी एक खास काढा पिण्याची गरज आहे. हळद, आले आणि गुळवेलाचा वापर करून हा काढा तयार करता येतो.
कसा बनवाल काढा?
न्यूट्रिशनिस्ट श्वेता यांच्यानुसार, हा डिटॉक्स काढा तयार करण्यासाठी आधी अर्धा चमचा गुळवेल पावडर, अर्धा चमचा हळद, आल्याचे २ ते ३ स्लाइस आणि दोन कप पाणी घ्या.
दोन कप पाणी एका भांड्यात उकडण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यात गुळवेल पावडर, हळद आणि आले टाका. १० ते १५ मिनिटं हे उकडू द्या. जेव्हा पाणी अर्ध शिल्लक राहील तेव्हा ते गाळून कोमट झाल्यावर प्या. हा काढा तुम्ही सकाळी उपाशीपोटी पिऊ शकता.
काय मिळेल फायदे?
न्यूट्रिशनिस्टनुसार, या हेल्दी काढ्यानं लिव्हर डिटॉक्स होतं. सोबतच पचन तंत्रही सुधारतं. लिव्हरवर आलेली सूज या काढ्यानं दूर होते. तसेच तुमचं मेटाबॉलिज्म वाढून वजन लवकर कमी करण्याची प्रक्रिया वेगानं होते. त्याशिवाय लिव्हर एंझाइम्सचं उत्पादन वाढवण्यासही मदत मिळेल.