How do you treat burning urine: लघवी करताना अनेकदा अनेकांना जळजळ किंवा खाज अशा समस्यांचा सामना करावा लागतो. ही समस्या फारच त्रासदायक असते. ही समस्या होण्यामागे कारणं वेगवेगळी असू शकतात. यात कमी पाणी पिणे, जास्त मसालेदार पदार्थ खाणे, स्वच्छ टॉयलेटचा वापर न करणे, यूटीआय इन्फेक्शन यांचा समावेश असतो. मात्र जास्तीत जास्त महिला या समस्येकडे सामान्य समस्या समजून दुर्लक्ष करतात. अशात ही समस्या आणखी जास्त वाढते. तुम्हाला सुद्धा ही समस्या नेहमीच होत असेल तर आम्ही तुम्हाला यावर एक खास उपाय सांगणार आहोत. महत्वाची बाब म्हणजे हा उपाय आयुर्वेदिक आहे.
काय सांगतात आयुर्वेद एक्सपर्ट?
आयुर्वेदिक न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी इन्स्टावर शेअर केलेल्या एका व्हिडिओत सांगितलं की, लघवी करत असताना जळजळ किंवा खाज येत असेल तर यावर औषधं घेण्याऐवजी तुम्ही एक सोपा उपाय करू शकता. बेकिंग सोडा तुमची ही समस्या दूर करू शकतो. कमीत कमी वेळात बेकिंग सोड्यानं तुम्हाला आराम मिळू शकतो. त्याशिवाय ज्या महिलांना व्हाइट डिस्चार्जची समस्या असते, त्यांच्यासाठी देखील बेकिंग सोडा खूप फायदेशीर ठरू शकतो.
कसा मिळेल फायदा?
न्यूट्रिशनिस्टनुसार, बेकिंग सोड्यानं शरीराची पीएच लेव्हल बॅलन्स होते, ज्यामुळे जळजळ आणि खाजेची समस्या दूर होते. बेकिंग सोडा बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शनही दूर करण्यास मदत करतो. इतकंच नाही तर बेकिंग सोडा शरीर आतून स्वच्छ करण्यासही मदत करतो. ज्यामुळे लघवी करताना जळजळ आणि खाज होत नाही.
कसा कराल उपाय?
हा उपाय करण्यासाठी 1/4 चमचा बेकिंग सोडा कोमट दुधात मिक्स करा. हे दूध तुम्ही दिवसातून एक किंवा दोन वेळा पिऊ शकता. न्यूट्रिशनिस्टनुसार, यानं पोटातील अॅसिडिटी कमी होते. यानं लघवी आणि प्रायव्हेट पार्टच्या इन्फेक्शनपासून आराम मिळतो. जर तुम्ही दूध पित नसाल तर तुम्ही बेकिंग सोडा पाण्यात टाकूनही पिऊ शकता.
इंटिमेट वॉश
बेकिंग सोडा दूध आणि पाण्यात टाकून पिण्यासोबतच तुम्ही त्वचा स्वच्छ करण्यासाठीही वापरू शकता. 1/4 चमचा बेकिंग सोडा 1 कप स्वच्छ पाण्यात टाका. या पाण्यानं दिवसातून एकदा प्रायव्हेट पार्ट धुवू शकता. असं केल्यानं खाज, जळजळ, दुर्गंधी अशा समस्या दूर होण्यास मदत मिळते.
काय काळजी घ्याल?
बेकिंग सोडा सांगण्यात आला तेवढाच म्हणजे 1/4 चमचा इतकाच घ्यायचा आहे. त्यापेक्षा जास्त सोडा घ्याल तर शरीरातील पीएच लेव्हल बिघडू शकते. जर त्वचेवर सोडा लावल्यानं खाज, जळजळ आणि रेडनेस वाढत असेल तर वापर लगेल बंद करा.