Chinese Practice For Gas-Acidity: काही खाल्लं किंवा चहा प्यायल्यावर अनेकांना गॅस, अॅसिडिटी किंवा ब्लोटिंग म्हणजे पोट फुगण्याची समस्या होते. इतकंच नाही तर अनेकदा ब्लोटिंगमुळे व्यक्तीला श्वास घेणंही अवघड होतं. पोटात जळजळ होते, जडपणा वाटतो. अस्वस्थ वाटत असल्यानं कोणत्या कामातही लक्ष लागत नाही. जर आपल्याला सुद्धा या समस्या नेहमीच होत असतील तर एक खास चायनीज उपाय यावर फायदेशीर ठरू शकतो.
प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट लीमा महाजन यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्यांनी पोटासंबंधी या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी एक खूपच सोपा आणि प्रभावी उपाय सांगितला आहे. चला तर पाहुयात काय आहे हा चायनीज उपाय.
काय आहे उपाय?
लीमा महाजन सांगतात की, 'ब्लोटिंग, गॅस किंवा अॅसिडिटी झाल्यावर आपण एक खास चायनीज टेक्नीक फॉलो करू शकता. हा उपाय करून कोणत्याही साइड इफेक्टशिवाय आपल्याला लगेच आराम मिळू शकतो. ही टेक्नीक फॉलो करण्यासाठी आपल्याला फक्त पायांची मसाज करायची आहे'.
कशी कराल मसाज? बघा व्हिडीओ
न्यूट्रिशनिस्टनुसार, अशाप्रकारे मसाज केल्यानं एक पॉइंट सक्रिय होतो. चायनीज चिकित्सेनुसार, हा पॉइंट पचन तंत्राला मजबूत करतो, पोटातील सूज कमी करतो आणि आतड्यांचं कामही सुधारतो. ज्यामुळे पोटातील सूज कमी होते, गॅस आणि जडपणाही दूर होतो. इतकंच नाही तर मेंदू आणि पोटातील ताळमेळही सुधारतो.