Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उन्हाळ्यात राहा कूल! ऋजुता दिवेकर सांगतात ३ उपाय-महिलांनी तर घ्यायलाच हवी १ काळजी रोज

उन्हाळ्यात राहा कूल! ऋजुता दिवेकर सांगतात ३ उपाय-महिलांनी तर घ्यायलाच हवी १ काळजी रोज

Tips to Avoid Heatstroke : अलिकडेच न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी उष्णतेपासून बचाव करण्याचे उपाय सांगणारा एक व्हिडीओ एक्सवर पोस्ट केलाय. चला तर पाहुयात त्यांनी काय उपाय सांगितलेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 16:50 IST2026-03-13T09:47:01+5:302026-03-13T16:50:05+5:30

Tips to Avoid Heatstroke : अलिकडेच न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी उष्णतेपासून बचाव करण्याचे उपाय सांगणारा एक व्हिडीओ एक्सवर पोस्ट केलाय. चला तर पाहुयात त्यांनी काय उपाय सांगितलेत.

Nutritionist Rujuta Diwekar share these 3 tips to avoid heatstroke and stay cool in summer | उन्हाळ्यात राहा कूल! ऋजुता दिवेकर सांगतात ३ उपाय-महिलांनी तर घ्यायलाच हवी १ काळजी रोज

उन्हाळ्यात राहा कूल! ऋजुता दिवेकर सांगतात ३ उपाय-महिलांनी तर घ्यायलाच हवी १ काळजी रोज

Tips to Avoid Heatstroke : मार्च महिन्यातच मे आणि जून महिन्यांमध्ये जाणवणारा उकाडा सहन करावा लागतोय. असह्य उन्हामुळे लोकांची हालत खराब झालीये. दुपारच्या वेळी घरातून बाहेर पडणं म्हणजे उन्हाचा फटका बसण्याचा धोका. जेवढं बाहेर ऊन तापतंय, तेवढं शरीर आतून तापतंय. अशात उन्हापासून बचावासाठी आणि शरीर आतून थंड ठेवण्यासाठी काही गोष्टी फॉलो करणं खूप गरजेचं आहे. उष्णतेचा सामना करण्यासाठी उपाय शोधत असाल तर हा लेख आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. कारण अलिकडेच न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी उष्णतेपासून बचाव करण्याचे उपाय सांगणारा एक व्हिडीओ एक्सवर पोस्ट केलाय. चला तर पाहुयात त्यांनी काय उपाय सांगितलेत.

सगळ्यांनाच उष्णतेपासून आपला बचाव करायचा असतो. कारण उन्हाचा फटका बसला तर आरोग्याचं मोठं नुकसान होऊ शकतं. घराबाहेर पडताना जराही निष्काळजीपणा केला तर हीटस्ट्रोक, थकवा, डिहायड्रेशन, चक्कर येणे आणि पोटासंबंधी आजारांच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

उन्हापासून बचावाचे उपाय

नारळ पाणी आणि सब्जा सीड्सची कमाल

जास्त तापमानामुळे घाम जास्त येतो आणि शरीरातील पाणी कमी होऊ लागतं. ऋजुता सांगतात की, रोज दुपारी १२ वाजण्याआधी एक ग्लास नारळाचं पाणी नक्की प्या. पण फक्त नारळाचं पाणी पिऊ नका. यात १ चमचा सब्जा सीड्स घाला. हेही लक्षात ठेवा की, सब्जा आणि चिया सीड्स वेगवेगळे असतात. आपल्यालरा सब्जाचा वापर करायचा आहे. नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स, पोटॅशिअम आणि मॅगनीज असतं. त्यामुळे नारळाचं पाणी हे एक नॅचरल कुलंट ठरतं, जे शरीराल हायड्रेट ठेवलं आणि पचनही सुधारतं.

दुपारच्या जेवणात दही किंवा ताक

​या दिवसांमध्ये दुपारच्या जेवणासोबत दही किंवा ताक घ्या. ऋजुता सांगतात की, दही किंवा ताकात थोडी भाजलेली जिरे पूड घाला. दही, ताक आणि जिरे थंड असतात. याने पोटातील उष्णता शांत होते. तसेच शरीर हायड्रेट राहतं.

सायंकाळी किंवा रात्रीच्या जेवणानंतर केळी 

केळं केवळ एक फळ नसून पोटाच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे. ऋजुता यांच्यानुसार, सायंकाळी किंवा रात्रीच्या जेवणानंतर एक केळं नक्की खावं. केळं पोटासाठी खूप फायदेशीर असतं. कारण यात भरपूर इलेक्ट्रोलाइट्स असतात. याने पोट हलकं राहतं आणि सकाळी पोट सहज साफ होण्यासही मदत मिळते. 

महिलांसाठी खास टिप्स 

ऋजुता दिवेकर अशा महिलांचा आवर्जुन उल्लेख केलाय ज्या पेरिमेनोपॉज किंवा मेनोपॉजच्या फेजमध्ये आहेत. या वयात हार्मोनलामुळे पचनक्रिया स्लो होते आणि पोटात गॅस तयार होतो. त्यामुळे या महिलांनी या दिवसांमध्ये अधिक काळजी घ्यावी, वरील टिप्स फॉलो कराव्या.

Web Title : गर्मी से बचने के लिए ऋजुता दिवेकर के 3 उपाय।

Web Summary : पोषण विशेषज्ञ ऋजुता दिवेकर ने गर्मी से बचने के तीन सरल उपाय बताए: सब्जा के बीज के साथ नारियल पानी, दोपहर के भोजन में दही या छाछ, और रात के खाने के बाद केला। ये शरीर को हाइड्रेट करने, पेट को ठंडा करने और पाचन में मदद करते हैं।

Web Title : Rujuta Diwekar's 3 tips for summer heat protection revealed.

Web Summary : Nutritionist Rujuta Diwekar shares three simple tips to beat the summer heat: coconut water with sabja seeds, yogurt or buttermilk with cumin for lunch, and a banana after dinner. These help hydrate the body, cool the stomach, and aid digestion.