Join us

शिळा भात खाऊ नये, आहारतज्ज्ञांचा सल्ला! भात खाण्याची ‘ही’ पद्धत देतेय अनेकजणांना त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 19:12 IST

Health Tips : प्रसिद्ध न्यूट्रीशन कोच Ryan Fernando यांनी सांगितलं की, शिळा भात पोटाचं नुकसान करू शकतो.

Health Tips : आपल्या देशात रोज सगळ्यात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे भात. जवळपास सगळ्याच घरांमध्ये दिवसातून एकदा तरी भात खाल्लाच जातो. मऊ वरण-भात तर अनेकांच्या आवडीचा असतो. तर कुणी पुलाव किंवा बिर्याणीच्या रूपात भात खातात. भाताचे शरीराला अनेक फायदेही आहेत. पण काही स्थितीत भात घातकही ठरू शकतो. भात नुकसानकारक तेव्हा ठरतो, जेव्हा तुम्ही शिळा भात खाता. एका दिवसानंतर भात शिळा होतो असं नाही तर भात शिजवल्यावर एका तासानंतरही शिळा होतो. 

प्रसिद्ध न्यूट्रीशन कोच Ryan Fernando यांनी सांगितलं की, शिळा भात पोटाचं तुम्ही विचारही केला नसेल इतकं नुकसान करू शकतो. याचं कारण यातील Bacillus cereus बॅक्टेरिया.

Ryan Fernando सांगतात की, हा घातक बॅक्टेरिया तांदळामध्ये असतो. या बॅक्टेरियाला उष्णतेचाही काही फरक पडत नाही. म्हणजे तांदूळ शिजवल्यावरही तो नष्ट होत नाही. हा बॅक्टेरिया वाढण्यासाठी योग्य वेळेची वाट बघतो. हे वाढतात तेव्हा जेव्हा भात शिजवून झाल्यावर ठेवून देता म्हणजे शिळा होऊ देता.

कसा वाढतो हा बॅक्टेरिया?

कोच सांगतात की, जेव्हा भात शिजतो आणि त्याचं तापमान कमी होतं, तेव्हा हा बॅक्टेरिया वेगानं वाढू लागतो आणि विषारी पदार्थ रिलीज करतो. भात शिजवल्यानंतर केवळ एका तासात हा बॅक्टेरिया वाढू लागतो आणि भाताला विष बनवणं सुरू करतो.

शिळा भात गरम करूनही फायदा नाही

एक्सपर्ट म्हणाले की, या बॅक्टेरियाबाबत सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे जेव्हा तुम्ही शिळा भात गरम करता तेव्हाही तो नष्ट होत नाही. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की, भात गरम केल्यानं बॅक्टेरिया मरतात तर तुम्ही चुकताय.

कसा कराल बचाव?

कोच म्हणाले की, जर तुम्हाला हा बॅक्टेरिया पोटात जाऊ द्यायचा नसेल तर भात शिजवल्यावर लगेच १ तासाच्या आत खावा. जर वेळीच खात नसाल आणि फ्रिजमध्ये ठेवत असाल तर २४ तासांच्या आता खावा. 

एक्सपर्टनी सांगितलं की, हा बॅक्टेरिया पोटात जाऊन आतड्यांवर हल्ला करतो, ज्यामुळे फूड पॉयजनिंग, मळमळ, उलटी आणि जुलाब अशा समस्या होऊ शकता. ज्याला मेडिकल भाषेत फ्राइड राइस सिंड्रोम असं म्हणतात.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स