Bloating Remedy : बदलती लाइफस्टाईल, चुकीचं खाणं-पिणं आणि वाढत्या स्ट्रेसमुळे गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता यासांरख्या पोटासंबंधी समस्या कॉमन झाल्या आहेत. या समस्यामुळे शरीराचं नुकसान तर होतंच, सोबतच दिवसही बेकार होतो. डोकंही जागेवर राहत नाही. गॅस आणि पोट फुगणं ही एक कॉमन समस्या आहे. पण काही सोप्या सवयींच्या माध्यमातून या समस्या कमी केल्या जाऊ शकतात. न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशिअन शिखा अग्रवाल शर्मा यांनी या समस्या दूर करण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत, ज्या फॉलो करून आपल्याला आराम मिळू शकतो.
पोट फुगण्यावर घरगुती उपाय
पोट फुगण्याच्या समस्येने बरेच लोक वैतागलेले असतात. थोडं काही खाल्लं तरी काही लोकांचं पोट फुगतं. याची कारणं वेगवेगळी असू शकतात. जसे की, घाईघाईनं खाणं, कार्बोनेटेड पेय पिणे, तणाव आणि काही खाद्य पदार्थ. अशात ही समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत. अन्न व्यवस्थित चावून खाणं, गॅस होईल असे पदार्थ टाळणे, हर्बल चहा, तणाव कमी घेणे आणि फायबरचा आहारात समावेश करणे.
हळूहळू चावून खावे
घाईघाईनं काही खात असाल तर पोटात हवा खूप जाते. ज्यामुळे पोट फुगतं. जड वाटू लागतं आणि अस्वस्थ वाटतं. त्यामुळे काहीही खाताना हळूहळू व्यवस्थित चावून खावं. यानं पोटही फुगणार नाही आणि पचनही चांगलं होईल.
कार्बोनेटेड ड्रिंक्स टाळा
कार्बोनेटेड पेयांमुळे पोटात गॅस तयार होतो. त्यामुळे हे पेय टाळले पाहिजे. सोडा आणि इतर गोड पेयांमधये भरपूर साखर असते, ज्यामुळे पोट फुगतं. अशात हे पेय पिऊ नये.
हर्बल चहा
हर्बल चहा जसे की, आलं किंवा पुदिन्याचा चहानं आतड्यांना आराम मिळतो. आल्यामध्ये अॅंटी-इन्फ्लामेटरी गुण असतात, जे पोट फुगण्याची समस्या कमी करण्यास मदत करतात. पुदिन्यानं पचन तंत्र शांत करण्यास मदत मिळते.
स्ट्रेस कमी करा
जास्त तणावामुळे पचन तंत्राचं नुकसान होतं आणि पोट फुगण्याची समस्या वाढते. तणाव कमी करण्यासाठी योगा, मेडिटेशन किंवा मोठा श्वास घेण्याचा अभ्यास करू शकता.
फायबर पदार्थ खा
फायबर पचनासाठी मदत करतं. पण फायबर असलेले पदार्थ अधिक खाल्ल्यानं काही लोकांना गॅसची समस्या होते. त्यामुळे योग्य प्रमाणात आहारात फायबरचा समावेश करा. यासाठी फळं, भाज्या आणि कडधान्य खाऊ शकता.