Join us

कांदाच नाही तर कांद्याची सालही आहे प्रचंड गुणकारी, ४ जबरदस्त उपयोग - केसांपासून चेहऱ्यावरच्या डागांवर असरदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2022 13:01 IST

Onion Peels Uses कांद्याच्या सालीमध्ये अँटी-ऑक्सिडंटचे प्रमाण खूप जास्त असते. जे केसांना नवी चमक आणि चेहऱ्याला ग्लो देते.

कांदा फक्त रडवत नाही तर त्याचे अनेक फायदे आहेत. आपण कांदा फोडणीला तर वापरतोच परंतु, आपल्या शरीरासाठी देखील उपयुक्त आहे. कांदामध्ये असलेले पौष्टिक घटक त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर मानले जातात. आपल्याला कांद्याचे गुणधर्म आणि वापर माहीतच असेल. मात्र, त्याच्या सालीमध्ये देखील तितकेच गुणधर्म आढळतात. 

कांद्याच्या सालीमध्ये अँटी-ऑक्सिडंटचे प्रमाण खूप जास्त असते. यासोबतच यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आढळतात. जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. त्याचा वापर आपण अनेक कारणांसाठी करू शकता. स्कीनला नवी चमक देण्यापासून ते शरीरासाठी उपयुक्त आहे.

कांद्याच्या सालीचे वापर

ब्युटी एक्स्पर्टच्या अनुसार, जर चेहऱ्यावर पिंपल्सचे डाग आणि काळपटपणापासून त्रस्त असाल, तर कांदाचे साल मदतगार ठरेल. महागड्या प्रॉडक्टसचा वापर करण्यापेक्षा कांद्याचा घरगुती वापर करून पाहा. याने नक्की फरक जाणवेल.

काळपट पडलेल्या डागांवर कांद्याच्या सालीचे पेस्ट लावा. काही वेळानंतर धुवून टाका. याने चेहऱ्यावरील डाग कमी होतील.

केसांना सुंदर बनवण्यासाठी कांद्याच्या सालीचे पाणी देखील वापरू शकता. हा उपाय खूप प्रभावी आहे. याच्या नियमित वापराने आपले केस मुलायम आणि चमकदार होतील. 

तज्ज्ञांच्या मते, घसा दुखत असल्यास कांद्याची साल आपल्याला आराम देईल. कांद्याची साले गरम पाण्यात उकळून घ्या व ते पाणी प्या. कांद्याचे हे पाणी घशाशी संबंधित समस्यांपासून सुटका देईल.

टॅग्स : कांदाहेल्थ टिप्सत्वचेची काळजीकेसांची काळजी