Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Corona Virus : धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?

Corona Virus : धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?

Corona Virus : कोरोना व्हायरसमुळे तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 12:32 IST2025-06-06T12:31:11+5:302025-06-06T12:32:06+5:30

Corona Virus : कोरोना व्हायरसमुळे तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

noida 3 years old girl child died by Corona Virus is new variant fatal for children | Corona Virus : धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?

Corona Virus : धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?

उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये कोरोना व्हायरसमुळे तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला डिहायड्रेशनचा त्रास होत होता, त्यानंतर तिला दिल्लीतील चाचा नेहरू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तपासणीदरम्यान मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळली आणि नंतर तिचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत कोरोनाचा नवीन व्हेरिएंट मुलांसाठी किती धोकादायक आहे ते जाणून घेऊया...

देशभरात कोरोनाचे रुग्ण खूप वेगाने वाढत आहेत. ओमायक्रॉनचे JN.1, LF.7 आणि NB.1.8.1 हे सब व्हेरिएंट यामागचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. WHO ने दिलेलया माहितीनुसार, NB.1.8.1 हा कोरोनाचा एक नवीन सब व्हेरिएंट आहे, जो JN.1 व्हेरिएंटचा वंशज आहे आणि तो ओमायक्रॉन व्हेरिएंटशी देखील संबंधित आहे. हा व्हेरिएंट सर्वात आधी जानेवारी २०२५ मध्ये तामिळनाडूमध्ये  कोविड-१९ जीनोम सिक्वेन्सिंग कन्सोर्टियमने शोधला होता.


 

WHO ने या व्हेरिएंटला व्हेरिएंट अंडर मॉनिटरिंग (VUM) म्हणून कॅटगराइज केलं आहे. NB.1.8.1 मध्ये  एक्स्ट्रा स्पाइक म्यूटेशन T22N, F59S, G184S, A435S, V445H आणि T478I आहेत, जे ते ओमायक्रॉन सब व्हेरिएंटपेक्षा अधिक संसर्गजन्य बनवतात. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, NB.1.8.1 सब व्हेरिएंटमुळे गंभीर आजार निर्माण होण्याची शक्यता कमी आहे, परंतु नोएडामधील मुलीच्या मृत्यूने चिंता वाढवली आहे. 

कोरोना वाढतोय मास्क तर लावाच, 'या' ५ उपायांनी वाढवा प्रतिकारशक्ती-इन्फेक्शनचा धोका टाळा

कोरोनाचा मुलांवर होणारा परिणाम

२०२० मध्ये कोरोना साथीच्या सुरुवातीला असं मानलं जात होतं की, मुलांवर व्हायरसचा कमी परिणाम होतो. त्यामुळेच त्यांच्यामध्ये बहुतेक सौम्य किंवा लक्षणं नसलेले रुग्ण आढळून येतात. मात्र डेल्टा आणि ओमायक्रॉनसारख्या व्हेरिएंटनंतर, मुलांनाही कोरोना व्हायरसची लागण झाली. विशेषतः ती मुले कोविड पॉझिटिव्ह आढळली, ज्यांचं लसीकरण करता आलं नाही. २०२२ पर्यंत, जागतिक आकडेवारीवरून असं दिसून आले की मुलांमध्ये SARS-CoV-2 चे रुग्ण वाढत आहेत. लसीकरण दर कमी असलेल्या भागात असे रुग्ण जास्त दिसून आले.

 

नोएडामध्ये मृत्यू झालेली मुलगी तीन वर्षांची होती आणि तिला डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तपासणीदरम्यान, ती कोविड-१९ पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. अशा परिस्थितीत कोरोना व्हायरसमुळे मुलाचं आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे.  

चिंताजनक! 'या' लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका, 'हे' आजार असल्यास ठरेल जीवघेणा

NB.1.8.1 मुलांसाठी घातक आहे का?

स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संसर्गजन्य रोग तज्ञ डॉ. यवोन माल्डोनाडो यांनी दिलेल्या माहितीनुसार, NB.1.8.1 अधिक संसर्गजन्य आहे, परंतु त्यामुळे गंभीर आजार होत नाहीत. काही प्रकरणांमध्ये, जसं की लहान मुलांसाठी किंवा आधीच गंभीर आजार असलेल्या मुलांसाठी, ते समस्या वाढवू शकतात. अमेरिकेत गेल्या एका वर्षात कोरोनामुळे १५० मुलांचा मृत्यू झाला आहे, जो इन्फ्लूएंझामुळे झालेल्या २३१ मुलांच्या मृत्यूइतकाच आहे. मुलाची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असेल किंवा त्याला गंभीर आजार असतील तर समस्या वाढू शकते.


 

Web Title: noida 3 years old girl child died by Corona Virus is new variant fatal for children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.