Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कितीही मीठ घातले तरी जेवण अळणीच वाटते ? मीठ जास्त खात असाल तर वेळीच सावध व्हा कारण ...

कितीही मीठ घातले तरी जेवण अळणीच वाटते ? मीठ जास्त खात असाल तर वेळीच सावध व्हा कारण ...

No matter how much salt you add, your food still tastes saltless? If you are eating too much salt, be careful because : कितीही मीठ घातले तरी जेवण अळणी वाटते. पाहा काय कारण असते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2025 16:25 IST2025-09-12T16:24:24+5:302025-09-12T16:25:27+5:30

No matter how much salt you add, your food still tastes saltless? If you are eating too much salt, be careful because : कितीही मीठ घातले तरी जेवण अळणी वाटते. पाहा काय कारण असते.

No matter how much salt you add, your food still tastes saltless? If you are eating too much salt, be careful because... | कितीही मीठ घातले तरी जेवण अळणीच वाटते ? मीठ जास्त खात असाल तर वेळीच सावध व्हा कारण ...

कितीही मीठ घातले तरी जेवण अळणीच वाटते ? मीठ जास्त खात असाल तर वेळीच सावध व्हा कारण ...

रोजच्या आहारात अनेक पदार्थ आपण वारतो. मात्र एक पदार्थ असा आहे जो वापरला नाही तर जेवणाला चवच येत नाही. तो पदार्थ म्हणजे मीठ. स्वयंपाक घरात बाकी काही असो वा नसो मीठ तर असतेच. (No matter how much salt you add, your food still tastes saltless? If you are eating too much salt, be careful because...)मीठाशिवाय जेवण छान लागूच शकत नाही. अळणी पदार्थ कोणी खात नाही. मात्र प्रत्येकाला पदार्थात मिठाचे लागणारे प्रमाणही वेगवेगळं आहे. काहींना मीठ कमी लागतं तर काहींना मीठ जास्त लागतं. पदार्थात वरतूनही काही जण मीठ घेतात. 

अनेकदा काही लोकांना जेवणात कितीही मीठ घातले तरी अळणीच वाटते. सतत जास्त मीठाची गरज भासते. पदार्थात मीठ असले तर बाजूला चमचाभर मीठ लागते. मात्र अति मीठ खाणे तोंडाच्या चवीचा   प्रकरण नसून शरीरातील काही बदलांचा संकेत असतो. जास्त मीठ खाण्याची सवय लागल्यास शरीराच्या  संवेदनशीलतेवर परिणाम होतो आणि मग गरजेपेक्षा जास्त मीठ खायची सवय लागते. ही सवय हळूहळू आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. अति मीठ खलल्याने शरीरात पाणी जास्त प्रमाणात साचते, त्यामुळे सूज येणे, वजन वाढणे आणि रक्तदाब वाढणे यांसारख्या समस्या उद्भवतात. उच्च रक्तदाब हा पुढे हृदयविकार आणि मूत्रपिंडांच्या आजाराला कारणीभूत ठरतो.

जेव्हा शरीरात सोडियमचे प्रमाण कमी होते किंवा काही वेळा मानसिक ताण, थकवा, हार्मोनल बदल यामुळे देखील लोकांना जास्त मीठ खाण्याची इच्छा होते. काही जणांमध्ये ही सवय लहानपणापासून लागलेली असते आणि नंतर ती हळूहळू वाढत जाते. पण लक्षात ठेवावे की शरीराला आवश्यक तेवढेच मीठ खावे. सोडियमचे प्रमाण जास्त झाले तर विविध आजार होतात. 

म्हणून जेवण कायमच अळणी वाटत असेल तर त्यात जास्तीचे मीठ घालून प्रत्येक वेळ दुर्लक्ष करु नका. त्याऐवजी शरीरातील आरोग्याच्या समस्या शोधणे आवश्यक आहे. तसेच हळूहळू मीठाचे प्रमाण कमी करण्याची सवय लावल्यास जीभ पुन्हा संवेदनशील होते आणि साध्या प्रमाणातले मीठही पुरेसे वाटू लागते. त्यामुळे अति मीठ खाण्याची सवय वेळीच बदला. 

Web Title: No matter how much salt you add, your food still tastes saltless? If you are eating too much salt, be careful because...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.