Join us
Daily Top 2 Weekly Top 5

नीम फूट थेरपी: वाचा कडुलिंब आणि कारल्याच्या पाण्यात १५ मिनिटे पाय बुडविण्याचे गजब फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2026 16:45 IST

Amazing Benefits of Neem Foot Therapy: कडुलिंब आणि कारलं वापरून करण्यात येत असलेली नीम फूट थेरपी म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का?

आपल्या तळपायांवर शेकडो प्रेशर पॉईंट्स असतात. त्याद्वारे कित्येक त्रास कमी करता येतात. त्यामुळेच पायांची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. तळपास रोजच्या रोज आपण बारकाईने निरखूप पाहायला हवेत, असं तज्ज्ञ नेहमीच सांगतात. साधं मीठ घातलेल्या गरम पाण्यात काही मिनिटे पाय बुडवून ठेवल्यानेही कित्येक त्रास कमी होतात. यावरूनच तळपायांची काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येतं. आता अशीच एक नीम फूट थेरपी पाहा (neem foot therapy). आरोग्याला कित्येक फायदे मिळवून देणारी ही थेरपी नेमकी कशी, ती घरच्याघरी करता येते का आणि त्याने आरोग्याला नेमके काय लाभ होतात ते पाहुया..(Amazing Benefits of Neem Foot Therapy)

 

नीम फूट थेरपी म्हणजे काय?

याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ patalinbailife या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये कडुलिंब आणि कारल्याचा शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी कसा वापर करायचा ते सांगितलं आहे. आयुर्वेदानुसार ही एक अतिशय उत्तम डिटॉक्स पद्धत आहे.  

आलिया भट्टने कान्समध्ये दाखवला नथीचा नखरा, पाहा भारतीय पारंपरिक नथींचे वेगवेगळे प्रकार

त्यासाठी कडुलिंबाची पाने आणि कारले एकत्र करून वाटून घ्या. त्याची पेस्ट एका मोठ्या टबमध्ये टाका. त्यात थोडं पाणी घाला आणि त्यामध्ये पाय बुडवून पायाने ते मिश्रण दाबल्यासारखे करा. साधारण १५ ते २० मिनिटे ही क्रिया चालू ठेवा. शेवटी कारल्याचा अर्क तुम्हाला तुमच्या जिभेवर जाणवू लागेल असं सांगितलं आहे. त्यानंतर पाय या मिश्रणातून काढून घ्या आणि स्वच्छ धुवून टाका.

 

नीम फूट थेरपीचे फायदे 

१. रक्तातील साखर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहींसाठी ही थेरपी विशेष फायदेशीर ठरते.

२. शरीरातले विषारी घटक शरीराबाहेर पडतात आणि त्यामुळे शरीर नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स होत जाते. 

लेकाच्या पदवीदान समारंभात सुप्रिया सुळेंनी नेसली भारतीय हातमाग परंपरेतली साडी, एका खास मैत्रीणीची भेट

३. पायांना खाज येत असेल, पायांना काही आजार असेल तर तो कमी करण्यासाठीही ही पद्धती उपयुक्त ठरते.

४. ही क्रिया करताना पायाच्या प्रेशर पॉईंट्सवर दाब पडतो. त्यामुळे शरीरातले रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. 


 

English
हिंदी सारांश
Web Title : Neem Foot Therapy: Amazing benefits of soaking feet in neem-bitter gourd water.

Web Summary : Neem foot therapy detoxifies, controls blood sugar, and improves circulation. A paste of neem and bitter gourd in water is used for a 15-20 minute soak. This Ayurvedic practice offers multiple health benefits.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समधुमेहघरगुती उपाय