Join us

Natural Ways to Get rid of Mosquitoes : रात्री डास खूप चावतात? करा 5 घरगुती उपाय, चावणार नाहीत डास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 15:38 IST

Natural Ways to Get rid of Mosquitoes : उन्हाळ्यात रात्री डास खूप चावतात? फक्त 5 उपाय; खिडक्या उघडल्यानंतरही आसपास भटकणार नाहीत डास

उन्हाळ्यात तुम्हाला उष्णतेपेक्षा डास जास्त तणावात टाकतात.(Mosquitoes ) डास मारण्याची कॉईल किंवा लिक्विड संपताच हे डास हल्ला करू लागतात.  तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीही, डास कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात लपून बसतात. फक्त संधी शोधत असतात की डासांपासून बचाव करणारे साधन कधी संपेल आणि ते कधी चावतील. या डासांमुळे सर्वांनाच त्रास होतो. कधीकधी असे वाटते की उष्णता सहन करणे शक्य आहे परंतु ते डास नाही. डासांनी तुमचीही अशी वाईट अवस्था केली असेल तर  काही घरगुती उपाय तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतात. (5 home remedies to get rid of mosquitoes and homemade mosquito repellent)

लसूण

लसणाचा (Garlic)  रस डासांना सहन होत नाही. त्यामुळे डासांना पळवण्यासाठी तुम्ही लसणाची मदत घेऊ शकता. लसणाच्या पाकळ्या सोलून बारीक करून पाण्यात उकळून घ्या नंतर हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि संपूर्ण खोलीत शिंपडा. या उपायानं खोलीतील डास दूर पळून जातील. 

कॉफी

डास अंडी घालू शकतात किंवा प्रजनन करू शकतात असे वाटत असेल त्या ठिकाणी  कॉफी पावडर किंवा कॉफी ग्राउंड ठेवा. सर्व डास आणि त्यांची अंडी मरतील.

पुदीना

पुदिन्याच्या सुगंधाने डासांना त्रास होतो. घरभर पुदिन्याचे तेल शिंपडा. डास तुमच्या घरापासून दूर राहतील.

कडूलिंबाचं तेल

डास होऊ नयेत आणि डास घरापासून दूर राहण्यासाठी कडुलिंबाचे तेल पाण्यात मिसळून किंवा बॉडी लोशनमध्ये मिसळून शरीरावर लावा. डास तुमच्या आजूबाजूलाही फिरकणार नाहीत.

सोयाबीन तेल

सोयाबीन तेल देखील डासांना तुमच्यापासून दूर ठेवते. रात्री अंगावर लावून झोपल्यावर डास चावू शकणार नाहीत

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य