पाय दुखणे, पायांना सूज येणे किंवा पायांच्या नसांमध्ये तीव्र वेदना होणे असा त्रास आपल्यापैकी बऱ्याचजणांना रोज सतावतो. पायांवर दिसणाऱ्या निळ्या - हिरव्या नासा दुखणे म्हणजेच व्हेरिकोज व्हेन्सचा (Varicose Veins) त्रास अनेकदा असह्य होतो. काहीजणांच्या बाबतीत तर हे दुखणे नेहमीचेच असते. या पायांच्या नसा दुखण्यामुळे रोजच्या जीवनातील कामांवर आणि मनःस्थितीवर त्याचा थेट परिणाम होतो(natural remedies for varicose veins pain).
व्हेरिकोज व्हेन्समध्ये पायांच्या नसा मोठ्या होतात, वळतात आणि त्यांच्यात रक्त साठून राहते, ज्यामुळे असह्य वेदना आणि जडपणा जाणवतो. वेळीच या दुखण्याकडे लक्ष दिले नाही तर ही समस्या पुढे अजून वाढते आणि, साधं उभं राहणं, चालणं - फिरणं देखील कठीण होत. अशा परिस्थितीत, काळजी करू नका, काही नैसर्गिक औषधी पदार्थांच्या पोटली मसाजने (how to relieve varicose veins pain naturally) या वेदना कमी करता येतात आणि रक्तप्रवाह सुधारता येतो. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी नुकतेच त्यांच्या इन्स्टाग्रामवर, व्हेरिकोज व्हेन्सच्या दुखण्यावर उपयुक्त असा पोटली मसाजचा उत्तम घरगुती उपाय शेअर केला आहे. व्हेरिकोज व्हेन्सच्या त्रासात उपयोगी ठरणारी नैसर्गिक पोटली मसाजची सोपी आणि असरदार पद्धत पाहूयात...(Ayurvedic remedies for varicose veins).
ही पोटली तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :-
व्हेरिकोज व्हेन्सच्या त्रासावर असरदार अशी घरगुती पोटली तयार करण्यासाठी, प्रत्येकी २ टेबलस्पून ओवा, मेथी दाणे, बडीशेप, जिरे, अर्जुन छाल पावडर, जाडे मीठ, अश्वगंधा पावडर, कडुलिंबाची पाने ५ ते ६, एक सुती किंवा मलमलचे कापड इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
डायबिटीस वाढेल म्हणून दिवाळीत गोड खाणारच नाही ? ५ टिप्स, गोड खाऊनही शुगर वाढणार नाही...
पोटली कशी तयार करावी ?
व्हेरिकोज व्हेन्सवरील उपचारासाठी पोटली तयार करण्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये, सगळे जिन्नस एकत्रित करुन ते ४ ते ५ मिनिटे कोरडे भाजून घ्यावेत. हे सगळे जिन्नस तोपर्यंत भाजत राहा जोपर्यंत त्यातून हलका सुगंध येत नाही. भाजलेले सगळे औषधी घटक एका मलमलच्या किंवा जाड सुती कापडावर काढून घ्या. या कापडाला घट्ट बांधून त्याची एक छोटीशी पोटली तयार करा. वापरण्यापूर्वी, ही पोटली तव्यावर किंवा कढईत फक्त १५ सेकंदांसाठी पुन्हा गरम करून घ्या.
या पोटलीचा वापर कसा करावा ?
१. सर्वात आधी आरामशीर खाली बसा आणि आपले पाय हलकेसे वर उंचावर ठेवा.
२. ही कोमट पोटली नंतर व्हेरिकोज व्हेन्सन असलेल्या भागावर हळूवारपणे दाब देत मसाज करुन घ्यावा.
३. या पोटलीने नेहमी खालून वरच्या दिशेने मसाज करुन घ्या. यामुळे नसांमध्ये रक्ताचा प्रवाह वरच्या दिशेने जाण्यास मदत होते आणि रक्ताभिसरण सुधारते.
४. ही थेरपी रोज किंवा दर दोन दिवसांनी १० ते १५ मिनिटांसाठी करा.
५. थेरपी पूर्ण झाल्यानंतर, १० मिनिटांपर्यंत आपले पाय थोडे वर उचलून उंचावर ठेवा.
पोटली मसाज करण्याचे फायदे...
१. नसांमधील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते.
२. सूज आणि जळजळ कमी करण्यातही उपयुक्त आहे.
३. याच्या वापरामुळे स्नायूंना खूप आराम मिळतो. स्नायूंचे दुखणे आणि वेदना कमी होतात.
४. त्वचेवर होणारी हलकी जळजळ शांत करण्यासही मदत करते.