Healthy Drinks for Kidney : किडनी शरीरातील रक्त शुद्ध करण्याचं आणि शरीरातून विषारी तत्व बाहेर काढण्याचं काम करतात. पण जर हे विषारी तत्व शरीरातून बाहेर पडले नाही तर किनडीला डॅमेज होतात. कारण किडनीचे फिल्टर निकामी झालेले असतात. अशात शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्यासाठी आणि किडनी निरोगी ठेवण्यासाठी काही खास ड्रिंक्स पिऊ शकता. चला पाहुयात घेऊ किडनी साफ ठेवण्यासाठी कोणते ड्रिंक फायदेशीर ठरतात.
किडनी आपल्या शरीरातून टॉक्सिन बाहेर काढण्याचं काम करते आणि तरल पदार्थ लघवीच्या माध्यमातून बाहेर काढते. त्याशिवाय किडनी मानवी शरीरात सोडिअम, पोटॅशिअम, अॅसिडचं प्रमाणही कंट्रोल करते. सोबतच किडनीमधून ते हार्मोनही रिलीज होतात जे आपल्या शरीराच्या इतर अवयवांच्या कार्यासाठी महत्वाचे असतात.
किडनीसाठी फायदेशीर आहे लिंबू
हार्वर्डच्या एका रिपोर्टनुसार, रोज दोन लिंबांचा रस प्यायल्याने यूरिन साइट्रेट (Urinary Citrate) वाढतं आणि किडनीतून टॉक्सिन बाहेर निघतात. अशात किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो. किडनीला हेल्दी बनवणारं हे ड्रिंक तुम्ही सकाळी आणि दुपारच्या वेळी सेवन करू शकता.
किडनी साफ करणारे लेमन ड्रिंक्स (Lemon Drinks for Kidney)
1) पुदीना असलेलं लिंबू पाणी
एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस, पुदीन्याची पाने आणि थोडी साखर टाकून चांगलं मिक्स करून घ्या. हे ड्रिंक किडनी हेल्दी ठेवण्यासाठी चांगलं मानलं जातं.
2) मसाला लिंबू सोडा
एका ग्लासमध्ये लिंबाचा रस, जिरे-धणे पूड, चाट मसाला आणि सोडा चांगलं मिक्स करा. अशाप्रकारे तुमचं किडनीसाठी हेल्दी ड्रिंक तयार झालं.
3) नारळाचं पाणी आणि लिंबू
हे हेल्दी ड्रिंक तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यात नारळाचं पाणी टाका. या पाण्यात लिंबाचा रस पिळून प्या. याने तुमची किडनी निरोगी आणि फीट राहते.