Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > नखं तुटतात, सतत अशक्तपणा-आळस येतो? ‘या’ व्हिटामिनची मोठी कमतरता-तातडीने गाठा डॉक्टर

नखं तुटतात, सतत अशक्तपणा-आळस येतो? ‘या’ व्हिटामिनची मोठी कमतरता-तातडीने गाठा डॉक्टर

Vitamin Deficiency: मोठ्या मेहनतीनं वाढवलेली आणि जपलेली नखं तुटतात कशामुळे याची कारणं माहीत असणं आवश्यक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 17:45 IST2026-03-03T11:00:38+5:302026-03-03T17:45:01+5:30

Vitamin Deficiency: मोठ्या मेहनतीनं वाढवलेली आणि जपलेली नखं तुटतात कशामुळे याची कारणं माहीत असणं आवश्यक आहे.

Nails break, weakness in body can be sign of vitamin b12 deficiency | नखं तुटतात, सतत अशक्तपणा-आळस येतो? ‘या’ व्हिटामिनची मोठी कमतरता-तातडीने गाठा डॉक्टर

नखं तुटतात, सतत अशक्तपणा-आळस येतो? ‘या’ व्हिटामिनची मोठी कमतरता-तातडीने गाठा डॉक्टर

Vitamin Deficiency:  शरीर एका मशिनसारखं असतं. आत काहीही गडबड झाली तर शरीर त्याचे काही संकेत देतं. जे वेळीच ओळखून त्यावर योग्य ते उपचार करावे लागतात. नाही तर तब्येत आणखी बिघडते किंवा समस्या वाढते. शरीरातील वेगवेगळ्या बिघाडांचे वेगवेगळे संकेत मिळत असतात. जसे की, नखं तुटणे. बऱ्याच जणांना वाटतं की, नखं तुटणे म्हणजे सामान्य आहे. पण नखं तुटण्यामागे काहीना काही कारणं असतात. जसे की, काही खास व्हिटामिन्सची कमतरता. अशात मोठ्या मेहनतीनं वाढवलेली आणि जपलेली नखं तुटतात कशामुळे याची कारणं माहीत असणं आवश्यक आहे.

व्हिटामिन बी १२ ची कमतरता  

नखं सहजपणे जर तुटत असतील तर याचा अर्थ होतो की, नखांचं आरोग्य कमजोर झालं आहे. जेव्हा शरीरात व्हिटामिन बी १२ ची कमतरता होते, तेव्हा नखं तुटण्यासारखी लक्षण दिसू लागतात. त्यासोबतच एनर्जी लेव्हल कमी होणे किंवा सतत कमजोरी जाणवत असेल तर हे सुद्धा व्हिटामिन बी १२ कमी झाल्याची लक्षणं आहेत. 

या लक्षणांसोबतच जर त्वचा किंवा डोळे हलके पिवळे दिसत असतील तर वेळी सावध होण्याची गरज आहे. कारण हे सुद्धा व्हिटामिन बी १२ कमी होण्याचं लक्षण आहे. तसेच जेव्हा या व्हिटामिनची लेव्हल शरीरात कमी होते, तेव्हा श्वास भरून येणे, चक्कर येणे अशीही लक्षणं दिसू शकतात. हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, व्हिटामिन बी १२ कमी झाल्यावर हात-पायांमध्ये झिणझिण्या जाणवतात, जुलाब लागतात, मळमळ होते किंवा भूक कमी होते.

कोणत्या समस्यांचा वाढतो धोका? 

जर शरीरात जास्त काळ व्हिटामिन बी १२ ची कमतरता राहिली, तर अॅनीमियाचा धोका वाढू शकतो. त्याशिवाय व्हिटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे नर्व्हस सिस्टीमही वाईट प्रकारे प्रभावित होऊ शकते. ग्लोसायटिस म्हणजे जिभेवर सूज येण्याचं देखील कारण व्हिटामिन बी १२ ची कमतरता असू शकतं. आपल्याला कदाचित माहीत नसेल की, व्हिटामिन बी १२ कमी झाल्याने व्यक्तीचा डिप्रेशनमध्ये जाण्याचा धोकाही वाढतो.

व्हिटामिन बी१२ चे प्रमुख स्रोत:

डेअरी उत्पादने: दूध, दही, पनीर, चीज.

फोर्टिफाईड पदार्थ: सोया दूध, बदामाचे दूध, आणि काही तृणधान्ये.

शाकाहारी पर्याय: न्युट्रिशनल यीस्ट आणि सुके नोरी (समुद्री शेवाळ)

Web Title: Nails break, weakness in body can be sign of vitamin b12 deficiency