महिलांना नेलपेंट लावायला फार आवडतं. पण हीच आवड जीवावर देखील बेतू शकते. नेलपेंटचा आरोग्यावर वाईट परिणाम होत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. यामुळे स्किन कॅन्सरचा धोका वाढतो. हार्वर्ड हेल्थच्या एका रिपोर्टनुसार, अनेक नेलपेंटमध्ये फॉर्मल्डिहाइड, टोल्यून आणि डिब्यूटाइल फ्थेलेटसारखे केमिकल्स असतात. हे कॅन्सरसाठी कारणीभूत मानले जातात.
नेलपेंट वारंवार लावल्याने आणि नेल रिमूव्हरने काढून टाकल्याने ते त्वचेत शोषले जातात, ज्यामुळे स्किन कॅन्सरचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. आपल्या शरीरात प्रवेश केल्यानंतर ते त्वचा आणि पेशींना नुकसान करतात. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, सॅन डिएगो येथील रिसर्चना असं आढळून आलं की, यूव्हीपासून बनलेल्या नेलपेंटचा वारंवार वापर थेट पेशींवर परिणाम करतो. प्रयोगांमधून असं दिसून आलं की फक्त २० मिनिटांच्या यूव्ही एक्सपोजरमुळे २० ते ३० टक्के पेशी नष्ट होतात. सततच्या संपर्कामुळे ही संख्या ६० ते ७० टक्क्यांपर्यंत वाढली. डीएनएमध्ये बदल देखील दिसून आले ज्यामुळे स्किन कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
तज्ज्ञांनी दररोज नेलपेंट लावणं टाळण्याचा सल्ला दिला आहे. नखांना महिन्यातून एक ते दोन आठवडे ब्रेक दिला पाहिजे. जर तुम्हाला दररोज नेलपेंट लावायची असेल तर ट्रान्सपरंट नेलपेंट वापरण्याचा विचार करा. PubMed वर प्रकाशित झालेल्या एका सिस्टमॅटीक रिव्ह्यूमध्ये असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की जेल मॅनिक्युअरमध्ये वापरल्या जाणाऱ्या यूव्ही लँप्समुळे स्किन कॅन्सरचा धोका असला तरी तो पूर्णपणे सिद्ध होऊ शकलेला नाही.
शास्त्रज्ञांचा असं म्हणणं आहे की, सतत आणि दीर्घकाळ नेलपेंट वापरल्याने धोका वाढू शकतो. गर्भधारणेदरम्यान शक्य तितकी विशेष काळजी घेतली पाहिजे. शिवाय, लहान मुलांना नेलपॉलिशपासून दूर ठेवलं पाहिजे. संवेदनशील त्वचा असलेल्यांनी, कुटुंबाची कॅन्सर हिस्ट्री असलेल्यांनी, जेल पॉलिश आणि यूव्ही लँप्सचा वारंवार वापर करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.