Join us
Daily Top 2 Weekly Top 5

मोहरीचं तेल थंडीत ठरतं वरदान, ‘असं’ वापरलं तर मिळेल तुकतुकीत कांती आणि भरपूर ताकदीचं शरीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:03 IST

Mustard Oil Benefits In Winter : आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, मोहरीच्या तेलाने आरोग्यासोबतच त्वचेला सुद्धा भरपूर फायदे मिळतात.

Mustard Oil Benefits In Winter : वेगवेगळ्या तेलांच्या तुलनेत मोहरीचं तेल हे फार जास्त गुणकारी असं मानलं जातं. मोहरीचं तेल हे उष्ण असतं, अशात हिवाळ्यात याचे अनेक फायदे मिळतात. हिवाळ्यात मोहरीचं तेल अनेक दृष्टीने फायदेशीर ठरू शकतं. मोहरीच्या तेलामध्ये MUFA, PUFA, ओमेगा 3 आणि 6 फॅटी अ‍ॅसिड, व्हिटामिन ई, मिनरल्स आणि अ‍ॅंटीऑक्सीडेंट भरपूर असतात. तसेच यात अ‍ॅंटी-माइक्रोबियल गुणही भरपूर असतात. अशात या तेलाचे हिवाळ्यात काय काय फायदे मिळतात, हे माहीत असणं महत्वाचंच नाही तर गरजेचं ठरतं. आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, मोहरीच्या तेलाने आरोग्यासोबतच त्वचेला सुद्धा भरपूर फायदे मिळतात.

सर्दी-खोकला होईल दूर

धूळ, कोरडेपणा आणि कमी तापमानामुळे हिवाळ्यात सर्दी-खोकला सहजपणे होतो. मोहरीचं तेल हे गरम असतं, याने श्वसन मार्गातील अडथळा दूर करण्यास मदत मिळते. तुम्ही झोपताना एक चमचा मोहरीचं तेल छातीवर मालिश करत लावा. याने तुम्हाला आराम मिळेल. बंद नाक मोकळं करण्यासाठी एका भांड्यात उकडत्या पाण्यात मोहरीच्या तेलाचे काही थेंब टाका आणि त्याची वाफ घ्या. आणखी एक उपाय म्हणजे एक चमचा गरम मोहरीचं तेल आणि 2-3 बारीक केलेल्या लसणाचं मिक्स केलेलं तेल पायांवर लावा.

जॉईंट्सचं दुखणं होईल दूर

हिवाळ्यात हात, खांदे, गुडघ्यांचे जॉइंट्स आणि रक्तवाहिका आकुंचन पावतात. ज्यामुळे वेदना होतात. मजबूत अ‍ॅंटी इम्फ्लामेटरी गुणांमुळे मोहरीच्या तेलाने रक्त प्रवाहात सुधारणा होते. मोहरीच्या तेलाने नेहमी मालिश केली तर जॉईंट्स आणि मांसपेशीमधील वेदना दूर होते. 

खाजही होते दूर

थंड वातावरणामुळे हिवाळ्यात त्वचेवर खाज येण्याची समस्याही होते. त्वचा कोरडी पडते, त्वचेवर भेगा पडतात आणि त्वचा निर्जीव दिसू लागते. मोहरीच्या तेलामध्ये नॅच्युरल मॉइश्चरायजरचा वापर करणं त्वचेसाठी फायदेशीर असतं. यातील व्हिटॅमिन ई मुळे आणि अ‍ॅंटी इम्फ्लामेटरी गुणांमुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होते.

पायांच्या भेगा करा दूर

हिवाळ्यात टाचांना भेगा पडण्याची समस्या अनेकांना होते. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही मेणबत्तीच्या मेणाचा वापर करू शकता. समान प्रमाणात मोहरीच्या तेलात मेणबत्तीचा मेण टाका. हे गरम करा. हे जरा थंड होऊ द्या आणि नंतर टाचांवरील भेगांवर लावा. त्यानंतर सूती सॉक्स घाला. पायांच्या भेगा दूर होतील.

हिवाळ्यात त्वचेला होणारे इतर फायदे

त्वचा मऊ आणि ओलसर ठेवते – कोरडी व खवखवलेली त्वचा टाळते.

नैसर्गिक मॉइश्चरायझर – थंडीत त्वचेला पोषण देते.

ब्लड सर्कुलेशन सुधारते – मालिश केल्याने त्वचेला उब मिळते.

फंगल इन्फेक्शनपासून संरक्षण – यात अ‍ॅंटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.

त्वचा उजळ आणि निरोगी दिसते – नियमित वापराने निस्तेजपणा कमी होतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Mustard Oil: Winter's boon for health and skin, benefits revealed.

Web Summary : Mustard oil, rich in essential nutrients, offers warmth and combats winter ailments like colds and joint pain. It moisturizes skin, heals cracks, improves circulation, and fights infections, promoting healthy skin during winter.
टॅग्स : थंडीत त्वचेची काळजीहेल्थ टिप्सत्वचेची काळजी