तोंड येणं ही एक सामान्य समस्या आहे, परंतू हे जर वारंवार होत असेल तर ते गंभीर आजारांचं लक्षण असू शकतं. काही लोकांना याचा इतका त्रास होतो की सर्व प्रकारचे उपचार घेतल्यानंतरही ही समस्या दूर होत नाही.
तोंड येण्याची कारणं
पौष्टिक घटकांची कमतरता
व्हिटॅमिन बी १२, आयरन आणि फॉलिक एसिडच्या कमतरतेमुळे तोंड येतं.
पचनाच्या समस्या
पोटातील उष्णता, बद्धकोष्ठता किंवा एसिडिटी यासारख्या समस्यांमुळे अनेकदा तोंड येऊ शकतं.
तोंडातील इन्फेक्शन
तोंड व्यवस्थित स्वच्छ न केल्यास, बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शनमुळे तोंड येतं.
ताण
बऱ्याचदा, जास्त ताण देखील तोंड येण्यामागचं कारण असू शकतं.
हार्मोनल बदल
महिलांमध्ये मासिक पाळी दरम्यान हार्मोनल बदलांमुळे तोंड येऊ शकतं.
फूड इन्फेक्शन
काही पदार्थ आणि पेये, जसे की एसिडिक किंवा मसालेदार पदार्थ, तोंडाला त्रास देऊ शकतात.
सतत तोंड येण्यामुळे होणारे आजार
अशक्तपणा
शरीरात आयरनच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येतो, ज्यामुळे अनेकदा तोंडात फोड येतात.
डायबेटिस
ब्लड शुगर लेव्हल वाढल्याने शरीराची रोग प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते, ज्यामुळे तोंडात इन्फेक्शन आणि अल्सर होऊ शकतो.
सीलिएक आजार
सीलिएक हा एक पचनासंबंधित आजार आहे जो लहान आतड्याला नुकसान पोहोचवतो.
तोंडाचा कॅन्सर
जर एखाद्या व्यक्तीला सतत तोंड येत असेल तर ते तोंडाच्या कॅन्सरचं लक्षण देखील असू शकतं.
तोंड येऊ नये म्हणून अशी घ्या काळजी
निरोगी आहार घ्या - निरोगी आहारात फळं, भाज्या यांचा समावेश करा.
तोंड स्वच्छ ठेवा - दिवसातून दोनदा ब्रश करा. तोंड स्वच्छ ठेवा.
ताण कमी करा - ताण कमी करण्यासाठी योगा किंवा मेडिटेशन करा.
धूम्रपान आणि मद्यपान टाळा - धूम्रपान आणि मद्यपान तोंड येऊ शकतं.
डॉक्टरांचा सल्ला घ्या - जर तुम्हाला वारंवार तोंड येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.