Health Tips : सकाळ सामान्यपणे फ्रेश व्हायला हवी. कारण ७ ते ८ तासांच्या झोपेत शरीर रिपेअर झालेलं असतं. अशात सकाळी फ्रेश आणि ताजतवाणं वाटणं कॉमन आहे. पण बऱ्याच लोकांना सकाळी झोपेतून उठल्यावर काही समस्या जाणवू लागतात. काही लोकांना सकाळी तोंडात आंबट किंवा कडवट चव जाणवते. आपल्यासोबतही असं नेहमीच होत असेल तर वेळीच सावध होण्याची वेळ आली आहे. अशात सकाळी तोंडात आंबट - कडवट चव का जाणवते? याची कारणं आपण जाणून घेणार आहोत.
सकाळी वेगळी चव जाणवण्याची कारणं
अनेकदा आंबट किंवा कडवट चव शरीरात ताप मुरल्याचा संकेत असतो. पण जर अशी चव रोज जाणवत असेल तर पोटात काहीतरी गडबड झाल्याचा संकेत असू शकतो. तोंडाशी संबंधित प्रत्येक समस्येचं कनेक्शन हे पोटाशी असतं. जर पोट व्यवस्थित असेल तर तोंडाशी संबंधित समस्या कमी होतात.
पोटातील कोणत्या समस्येमुळे असं होतं?
सकाळी तोंडात आंबट किंवा कडवट चव जाणवत असेल तर याचा संबंध पोटासंबंधी समस्येशी जोडला गेला आहे. पोटात वाढत असलेल्या आम्लामुळे तोंडात आंबट आणि कडवट चव जाणवते. याला आधुनिक चिकित्सेत अॅसिड रिफ्लक्स म्हटलं जातं. आयुर्वेदात याला पित्तदोष म्हणतात. आयुर्वेदानुसार, जेव्हा शरीरात पित्त वाढतं, तेव्हा शरीरात आम्ल वाढतं. यामुळे पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. सोबतच यामुळे हाडं आणि जॉइंट्समध्ये कमजोरी सुद्धा बघितली जाते.
रात्रीच्या चुकांमुळे होते समस्या
सकाळी तोंडात आंबट किंवा कडवट चव जाण्याची कारणं वेगवेगळी आहेत. ज्यात रात्री उशीरा जेवण करणे, मद्यसेवन, तंबाखू, लिव्हर योग्यपणे काम न करणे, पचनासाठी आवश्यक अग्नि कमी होणे आणि पोटात अॅसिड वाढणे यांचा समावेश करता येईल. पोटात अॅसिड वाढण्यामागे चुकीचं खाणं-पिणं आणि जास्त वेळ उपाशी राहणं याचाही हात असतो.
आयुर्वेदिक उपाय
आयुर्वेदात ही समस्या दूर करण्याचे काही उपाय सांगितले आहेत. आयुर्वेदानुसार पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी त्रिफळा चूर्ण खाणं सगळ्यात फायदेशीर मानलं जातं. रात्री कोमट पाण्यात अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण टाकून प्या. याने सकाळी पोट साफ होईल आणि पित्तही शांत होईल. रात्रीच्या जेवणाच्या वेळेत बदल केल्यासही पोटातील वाढलेलं आम्ल कमी केलं जाऊ शकतं.
झोपण्याची पद्धत बदला
अॅसिड रिफ्लक्सची समस्या टाळायची असेल तर रात्री उशीरा जेवण करणं टाळा आणि रात्री लवकर जेवण करा. जेवण झाल्यावर लगेच बेडवर पडू नका, काही वेळ वॉक करा आणि डाव्या कुसेवर झोपा.
इतरही काही उपाय
तांब्याच्या भांड्यातील पाणी पोटातील आम्ल शांत करण्यासाठी फायदेशीर मानलं जातं. हे पाणी थंड असतं. यासाठी रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा आणि हे पाणी सकाळी प्या. तांब्याच्या भांड्यातील पाण्याने शरीर डिटॉक्स करण्यासही मदत मिळते. तेसच बडीशेप आणि खडीसाखरेचं पाणी देखील पचनासाठी चांगलं असतं. तसेच याने तोंडाच्या दुर्गंधीपासूनही सुटका मिळते.
