Join us

चीन अन् जपानमधील लोक रात्री आंघोळ करतात तर भारतीय सकाळी, मग बेस्ट वेळ कोणती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 20:00 IST

Bathing Habits : तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, चीन आणि जपानमधील लोकांची आंघोळीची सवय जरा वेगळी आहे. हे लोक सकाळऐवजी रात्री आंघोळ करणं पसंत करतात.

Bathing Habits : जन्मानंतर समजायला लागतं तेव्हापासून आपल्याला हेच माहीत असतं की, सकाळी झोपेतून उठल्यावर आंघोळ करावी लागते. घरातील मोठ्यांनाही हेच करताना बघत आपण लहानाचे मोठे होतो. उन्हाळा असेल किंवा एखादं मेहनतीचं काम केलं असेल तेव्हाच काही लोक सायंकाळी सुद्धा आंघोळ करतात. पण सामान्यपणे भारतात जास्तीत जास्त लोक सकाळीच आंघोळ करतात. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, चीन आणि जपानमधील लोकांची आंघोळीची सवय जरा वेगळी आहे. हे लोक सकाळऐवजी रात्री आंघोळ करणं पसंत करतात. अशात आंघोळीची योग्य वेळ कोणती हे समजून घेणं महत्वाचं ठरतं.

भारतात सामान्यपणे सगळेच लोक सकाळी आंघोळ करणं पसंत करतात. तर आशियातील काही देश जसे की, जपान आणि चीनमधील लोक रात्री आंघोळ करतात. कोरियामधील लोकही रात्रीच आंघोळ करतात. दुसरीकडे अमेरिका, कॅनडा आणि यूरोपसारख्या देशांमध्ये लोक सकाळी आंघोळ करणं पसंत करतात.

रात्री आंघोळ करण्याची कारणं...

चीनमध्ये अशी मान्यता आहे की, रात्री आंघोळ करून झोपल्यास दिवसभर शरीरावर जमा झालेला बॅक्टेरिया आणि नकारात्मक एनर्जी दूर होते. 

चीन आणि जपान दोन्ही देशांमध्ये असं मानलं जातं की, रात्री आंघोळ करणं ही एक हेल्दी सवय मानली जाते.

चीनमधील वातावरण उष्णकटीबंधीय आणि मॉइस्ट राहतं. त्यामुळे येथील लोकांना जास्त घाम येतो. याच कारणानं येथील लोक रात्री फ्रेश राहण्यासाठी आंघोळ करतात.

जपानमध्येही हेच मानलं जातं की, दिवसभर काम केल्यानंतर आंघोळ करणं म्हणजे आरामाची वेळ मानलं जातं. जपानमधील लोक या सवयीला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारच्या आरामासारखं बघतात.

रात्री आंघोळ करण्याचे फायदे

रात्री आंघोळ करण्याचे फायदे वेगवेगळे असतात. या सवयीनं शरीर आणि मेंदुला आराम मिळतो. रात्री आंघोळ केल्यानं झोपही चांगली लागते. गरम पाण्यानं आंघोळ केल्यास दिवसभराचा थकवा, दुखणं दूर होतं. रात्री आंघोळ केल्यास स्कीन इन्फेक्शनचा धोकाही कमी होतो. रात्री आंघोळ केल्यानं त्वचाही चांगली राहते.

सकाळी आंघोळ करण्याचे फायदे

सकाळी आंघोळ केल्यानं रात्रभराचा आळस दूर होतो आणि दिवसाची सुरूवात फ्रेश होते. सकाळी आंघोळ केल्यानं दिवसभर सुस्ती किंवा आळस जाणवत नाही.

आंघोळीची कोणती वेळ जास्त फायदेशीर?

आंघोळीच्या वेळेबाबत सायन्समध्ये बरंच काही सांगण्यात आलं आहे. काही रिसर्चनुसार, सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळा आंघोळीसाठी चांगल्या असतात. सकाळी आंघोळ केल्यानं फ्रेश वाटतं, तर रात्री आंघोळ केल्यास दिवसभराचा थकवा दूर होतो.

रात्री आणि सकाळी दोन्ही वेळ आंघोळ केल्यास मसल्स रिलॅक्स होतात. रात्री झोप चांगली येते आणि शरीराची वेगवेगळ्या आजारांसोबत लढण्याची क्षमताही वाढते. एकंदर काय तर दोन्ही वेळ आंघोळ केली तर फायदे मिळतातच.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स