Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > थंडीमुळे सकाळी झोपेतून उठण्याचा आळस येतो? या 5 टिप्स फॉलो करा, लवकर उठा..

थंडीमुळे सकाळी झोपेतून उठण्याचा आळस येतो? या 5 टिप्स फॉलो करा, लवकर उठा..

Morning Habits in Winter: थोडीशी थंडी वाढली की अंथरुणाची ऊब सोडून उठणं खूप कठीण वाटतं. अशा वेळी काही सोप्या उपायांनी तुम्ही थंडीतही सहज उठू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 10:21 IST2025-10-17T10:20:07+5:302025-10-17T10:21:24+5:30

Morning Habits in Winter: थोडीशी थंडी वाढली की अंथरुणाची ऊब सोडून उठणं खूप कठीण वाटतं. अशा वेळी काही सोप्या उपायांनी तुम्ही थंडीतही सहज उठू शकता.

Morning Habits in Winter: How to wake up early in the winter morning, follow these 5 tips | थंडीमुळे सकाळी झोपेतून उठण्याचा आळस येतो? या 5 टिप्स फॉलो करा, लवकर उठा..

थंडीमुळे सकाळी झोपेतून उठण्याचा आळस येतो? या 5 टिप्स फॉलो करा, लवकर उठा..

Morning Habits in Winter: ऑक्टोबर अर्धा संपला आहे आणि आता काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी हलकी थंडी जाणवू लागली आहे. खासकरून सकाळी आणि संध्याकाळी हवेत गारवा वाढलाय. हे दिवस बहुतेकांना आवडताच, पण याच काळात काही अडचणीही वाढतात. त्यापैकी एक म्हणजे सकाळी लवकर उठण्याची समस्या. थोडीशी थंडी वाढली की अंथरुणाची ऊब सोडून उठणं खूप कठीण वाटतं. अशा वेळी काही सोप्या उपायांनी तुम्ही थंडीतही सहज उठू शकता.

सकाळी लवकर उठण्यासाठी ५ सोपे उपाय

रात्री वेळेवर झोपा

सकाळी लवकर उठायचं असेल, तर सर्वात आधी रात्री वेळेवर झोपणं गरजेचं आहे. पुरेशी झोप घेतल्यावर शरीराला आळस येत नाही आणि उठणं सोपं होतं. पण जर तुम्ही उशिरापर्यंत मोबाईल वापरत असाल किंवा मालिका पाहत बसत असाल, तर शरीराला विश्रांती मिळत नाही आणि सकाळी उठणं अवघड जातं. त्यामुळे रात्री ९ ते १० वाजेदरम्यान झोपा. त्यामुळे शरीराची बायोलॉजिकल घड्याळ व्यवस्थित राहील आणि तुम्ही आपोआप वेळेवर जागे व्हाल.

अलार्म घड्याळ पलंगापासून दूर ठेवा

बरेच जण सकाळी उठण्यासाठी अलार्म लावतात, पण आळसामुळे वारंवार बंद करतात. त्यामुळे अलार्म थोडा पलंगापासून दूर ठेवा, जेणेकरून तो बंद करण्यासाठी तुम्हाला उठावं लागेल. उठल्यावर अर्धा आळस तसाच निघून जाईल.

झोपेतून उठताच पडदे उघडा

उठल्यानंतर ताबडतोब खोलीचे पडदे उघडा किंवा लाईट चालू करा. लख्खं प्रकाश तुमच्या मेंदूला जागे होण्याचा सिग्नल देतो, ज्यामुळे तुम्ही लगेच सतर्क आणि ऊर्जावान वाटता.

पलंगाजवळ उबदार कपडे किंवा जॅकेट ठेवा

थंडीचा त्रास कमी करण्यासाठी पलंगाजवळच स्वेटर किंवा जॅकेट ठेवा. अलार्म वाजताच लगेच ते घाला. त्यामुळे थंडी कमी जाणवेल आणि अंथरुणातून बाहेर पडणं सोपं वाटेल.

कोमट पाणी प्या

झोपेतून उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्या. त्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि ऊर्जा मिळते. पाणी पिल्याने झोप आणि आळस लगेच दूर होतो. अशा या ५ सोप्या टिप्स फॉलो करून आपण थंडीच्या दिवसांमध्ये सहजपणे लवकर उठू शकता आणि दिवसाची सुरुवात उत्साहाने करू शकता.

Web Title : सर्दी में सुबह जल्दी उठने के 5 आसान उपाय।

Web Summary : सर्दी में सुबह उठना मुश्किल? समय पर सोएं, अलार्म दूर रखें, पर्दे खोलें, गर्म कपड़े पहनें और गर्म पानी पिएं, ऊर्जावान शुरुआत करें।

Web Title : Beat winter blues: 5 tips for waking up early.

Web Summary : Struggling to wake up in winter? Sleep on time, keep alarm away, open curtains, wear warm clothes, and drink warm water for an energetic start.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.