आपल्या रोजच्या आहारात पोषणमूल्यांची कमतरता भरून काढण्यासाठी नैसर्गिक पर्याय शोधले जातात. अशा परिस्थितीत, सुपरफूड्सपैकी एक म्हणजे मोरिंगा पावडर, म्हणजेच (Moringa Leaves Health Benefits That You Should Know) शेवग्याच्या पानांची पावडर. आयुर्वेदात आणि सध्या हेल्थ कॉन्शियस असणारे अनेकजण मोरिंगा पावडरला विशेष महत्त्व देतात. शेवग्याच्या पानांची पावडर शरीरासाठी अत्यंत पोषक, अँटीऑक्सिडंट्सयुक्त आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी असते. आरोग्याच्या दृष्टीने ही पावडर आपल्या आहारात समाविष्ट करणे अनेक प्रकारे फायदेशीर ठरते(The incredible benefits of having fresh moringa leaves powder daily).
मोरिंगा पावडर, म्हणजेच शेवग्याच्या पानांपासून तयार केलेली पावडर, शक्तिवर्धक पदार्थ आहे. यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स यांचा समावेश असून, ही पावडर संपूर्ण शरीरासाठी उपयुक्त मानली जाते. सध्या जगभरात स्वतःबद्दलच्या फिटनेसची जागरूकता प्रत्येकांमध्ये वाढत असताना, बरेचजण आता केमिकल फ्री आणि नैसर्गिक पर्यायांकडे वळू लागले आहेत. शेवग्याच्या पानांची पावडर हे असेच एक सुपरफूड आहे जे तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात घेऊन, संपूर्ण आरोग्य तंदुरुस्त ठेवू शकता.
मोरिंगा पावडर रोजच्या आहारात घेण्याचे फायदे...
१. रोगप्रतिकारशक्ती वाढते :- शेवग्याच्या पानांच्या पावडरमध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि अँटी-बॅक्टेरियल घटक मोठ्या प्रमाणात असतात. हे शरीरातील विषाणूंशी लढण्याची ताकद निर्माण करतात. त्यामुळे सर्दी, ताप, थकवा यांसारख्या लहान-मोठ्या आजारांपासून संरक्षण मिळते.
२. हाडे व स्नायूंना बळकट करते :- शेवग्याच्या पानांच्या पावडरमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते, जे हाडे आणि स्नायूंना मजबुती देतात. विशेषतः महिलांमध्ये व वृद्धांमध्ये हाडांची झिज रोखण्यासाठी ही पावडर फायदेशीर ठरते.
३. हृदयाचे आरोग्य सुधारते :- शेवग्याच्या पानांच्या पावडर कोलेस्टेरॉल कमी करण्यात मदत करते आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवते. त्यामुळे हार्ट ॲटॅक, स्ट्रोक यांसारख्या हृदयविकारांचा धोका कमी होतो.
४. रक्तशुद्धी करण्यासाठी :- मोरिंगा पावडर शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकते व रक्त स्वच्छ ठेवते. यामुळे त्वचाविकार कमी होतात, चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येते आणि थकवा कमी होतो.
५. वेटलॉससाठी फायदेशीर :- शेवग्याच्या पानांची पावडर चयापचय क्रियेचा वेग (metabolism) वाढवते, ज्यामुळे शरीरात साठलेली चरबी हळूहळू वितळते. शिवाय, यामुळे पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे जास्त आणि सतत खाण्याची सवय टाळता येते.
६. पचनक्रिया सुधारते :- या पावडरमध्ये नैसर्गिक फायबर्स भरपूर प्रमाणांत असतात. त्यामुळे पचनाची क्रिया सहज होते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि अॅसिडिटी, गॅस यापासूनही आराम मिळतो.
७. साखर नियंत्रणात ठेवते :- मधुमेह असलेल्यांनी रोजच्या आहारात मोरिंगा पावडर घेतल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. ही पावडर इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवते, जे मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
शेवग्याच्या पानांची पावडर आहारात कशी वापरावी ?
आपल्या रोजच्या आहारात शेवग्याच्या पानांच्या पावडरचा समावेश करणे फायदेशीर ठरते. दररोज एक चमचा मोरिंगा पावडर तुम्ही कोमट पाण्यात, स्मूदी, फळांचा रस, सूप, किंवा डाळीमध्ये मिसळून घेऊ शकता. बरेचजण डिटॉक्स ड्रिंक म्हणून रिकाम्या पोटी पिणे पसंत करतात. जर तुम्हाला या पावडरीचा थोडासा कडवटपणा जाणवत असेल, तर त्यात लिंबाचा रस किंवा थोडं मध घालून सहजपणे अधिक चवदार करता येते. या पद्धतीने शेवग्याच्या पानांची पावडर नियमित आहारात घेतल्यास शरीराला त्याचे संपूर्ण पोषणमूल्य मिळते.