डाळ भारतीय खाण्याचा एक महत्वपूर्ण आहार आहे. डाळीच्या सेवनानं शरीराला प्रोटीन्स, फायबर्स, व्हिटामीन्स आणि मिनरल्स मिळतात तसंच आरोग्यही चांगले राहते. पण डाळ प्रत्येकाच्याच शरीरासाठी सारखा परिणाम करत नाही. प्रसिद्ध आयुर्वेदीक डॉक्टर सलीम जैदी यांनी आपल्या इंस्टाग्राम हॅण्डलवर याबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते सांगतात की प्रत्येक डाळीचा प्रभाव वेगवेगळा असतो. म्हणून आपल्या बॉडी टाईपनुसार डाळीची निवड करायला हवी. कोणती डाळ खाल्ल्यानं काय फायदे मिळतात समजून घेऊ. (Moong Masoor Chana Urad Arhar What Is The Healthiest Dal To Eat Ayurvedic Doctor Saleem Zaidi Shares Type Of Dal Their Effects)
मूग डाळ
डॉक्टर सांगतात की मुगाची डाळ या यादीत सर्वात आधी येते. मुगाची डाळ पचायला हलकी असते. ज्यामुळे पोटावर अतिरिक्त ताण येत नाही. गॅस, एसिडिटी कमी होते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही मुगाच्या डाळीचा आहारात समावेश करू शकता. ही डाळ खाल्ल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतील.
मसूर डाळ
मसूर डाळीत आयर्न मोठ्या प्रमाणात असते. रक्ताची कमतरता असल्यास मसूर डाळीचे सेवन करायला हवे. ज्यामुळे शरीरात एनर्जी टिकून राहते आणि थकवा कमी येतो. काही लोकांना मसूर डाळ खाल्ल्यामुळे गॅस होतो आणि शरीर कमकुवत होते. मसूर डाळ योग्य प्रमाणातच खायला हवी.
चणा डाळ
चणा डाळीत प्रोटीन, फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. कारण हळूहळू पचन होते. ही डाळ ब्लड शुगर वेगानं वाढू देत नाही. पचायला जड असते त्यामुळे कमकुवत पचन असलेल्या लोकांनी या डाळीचे कमी प्रमाणात सेवन करावे.
तुरीची डाळ
तुरीची डाळ एनर्जी देण्यासाठी संतुलित मानली जाते. ही डाळ जास्त जड नसते किंवा जास्त हलकीही नसते. म्हणून रोज खाण्यासाठी तुरीची डाळ उत्तम पर्याय आहे. तांदूळ आणि तुरीच्या डाळीची खिचडी तुम्ही खाऊ शकता.
उडीद डाळ
उडीदाची डाळ हाडं, मांसपेशींसाठी फायदेशीर मानली जाते. यात कॅल्शियम आणि इतर पौष्टीक तत्व असतात. ज्यामुळे गॅस, एसिडिटी, पाईल्सची समस्या उद्भवत नाही. म्हणून उडीदाची डाळ खायला हवी.
