Symptoms of Vitamin D Deficiency: धावपळीचं जीवन, कामाचा वाढता ताण आणि जबाबदाऱ्यांचं ओझं यामुळे लोक अलिकडे वेगवगळ्या गंभीर आजारांचे शिकार होत आहेत. आहारातून गायब झालेल्या पोषणामुळे शरीराला सुद्धा हवे ते पोषक तत्व मिळत नाहीत. ज्यामुळे आरोग्यासंबंधी समस्या अधिकच वाढतात. पूर्वी लोक सकाळची उन्हात बसत होते, पण आता ऑफिस आणि घरच्या धकाधकीतून बाहेर पडायलाच वेळ मिळत नाही. त्यामुळे शरीरावर सूर्यप्रकाशाचा परिणाम कमी झाला आहे आणि याचा थेट आरोग्यावर परिणाम दिसून येतो.
आधुनिक विज्ञान आणि आयुर्वेद दोन्ही मानतात की शरीराचे संतुलन तेव्हाच टिकते, जेव्हा त्याला सूर्याची ऊर्जा योग्य प्रमाणात मिळते. व्हिटामिन D हे त्या ऊर्जेचेच एक रूप आहे, जे आपल्याला सूर्यप्रकाशातून मिळतं. त्यामुळेच याला सनशाईन व्हिटामिन असेही म्हटले जाते, कारण हे त्वचेवर पडणाऱ्या सूर्यकिरणांमुळे तयार होते.
भारतात व्हिटामिन D ची कमतरता का?
हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते भारतातील मोठ्या प्रमाणात लोक व्हिटामिन D च्या कमतरतेने त्रस्त आहेत. शरीरात हे व्हिटामिन कमी झाले की केवळ हाडांवर नाही, तर मेटाबॉलिझमवर देखील परिणाम होतो. तसेच खालीलही काही समस्या होतात.
वजन वाढणे
सतत थकवा जाणवणे
झोप न लागणे
आणि वारंवार काहीतरी खाण्याची इच्छा होणे
व्हिटामिन D शरीरातील सेरोटोनिन हार्मोन नियंत्रित करण्याचे काम करतं. हा हार्मोन आपल्या मूड आणि भुकेवर प्रभाव टाकतो. त्यामुळे जेव्हा व्हिटामिन D कमी होतं, तेव्हा झोप नीट लागत नाही, मूड वारंवार बदलतो आणि व्यक्ती गरजेपेक्षा जास्त खातो.
याच ओव्हरईटिंगमुळे हळूहळू लठ्ठपणा वाढतो. तसेच व्हिटामिन D च्या कमतरतेने इन्सुलिनचे संतुलन बिघडते, ज्यामुळे शरीरात चरबी साठू लागते आणि वजन कमी करणे अधिक अवघड होते.
सूर्याची कोवळी किरणे केवळ शरीरात व्हिटामिन D निर्माण करत नाहीत, तर मानसिक ताजेपणा आणि ऊर्जा देतात.
व्हिटामिन D कमी झाल्याची लक्षणे
जर शरीरात व्हिटामिन D कमी झाले तर खालील लक्षणे दिसू शकतात —
सतत थकवा जाणवणे
हाडे आणि स्नायूंमध्ये वेदना
केस गळणे
मूड वारंवार बदलणे
अनेकदा लोक ही लक्षणे ताणतणाव किंवा झोपेच्या कमतरतेमुळे आहेत असे समजतात, पण प्रत्यक्षात यामागे कारण असते व्हिटामिन D ची कमतरता.
व्हिटामिन D मिळवण्यासाठी उपाय
रोज २० ते ३० मिनिटे सूर्यप्रकाशात राहणे हा सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे. आहारात फोर्टिफाइड संत्र्याचा रस, ओट्स, आणि धान्ये यांचा समावेश करा. आयुर्वेदानुसार तीळ तेल, आवळा आणि अश्वगंधा यांचे सेवन फायदेशीर आहे. जर आहारातून पुरेसं व्हिटामिन D मिळत नसेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घेऊ शकता.
