काई युक्सिन. तैवानची प्रसिद्ध कार शो मॉडेल. तैवानमध्ये फारच प्रसिद्ध आणि तरुणांच्या दिल की धडकन. सोशल मीडियावर तिचे खूपच चाहते आहेत.(Weight loss gone wrong) याशिवाय तिचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री लिन-ची-लिंग हिच्या चेहऱ्याशी तिचं बरंच साम्य आहे. आपल्या सौंदर्यानं तिनं चाहत्यांना घायाळ केलं आहे.(Dangerous beauty treatments)
हीच काई युक्सिन सध्या एका वेगळ्याच कारणानं संपूर्ण जगभरात गाजते आहे. ‘दुधाच्या इंजेक्शन’नं तिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तिच्या नातेवाइकांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. काय आहे हे ‘दुधाचं इंजेक्शन’? त्यामुळे माणूस मरू कसा काय शकतो? - त्याचीही एक मोठी कहाणी आहे.(kai yuxin dies after milk injection)
पावसाळ्यात साचलेल्या घाण पाण्यात जपून चाला, पसरतोय गंभीर संसर्गजन्य आजार- जीवावर बेतेल
तीस वर्षीय काई युक्सिन कार एक्सपो आणि मोटर शोमधील अतिशय पॉप्युलर मॉडेल. गेल्या बऱ्याच काळापासून निद्रानाशानं ती त्रस्त होती. त्यावर अनेक तऱ्हेचे उपचारही ती घेत होती. शेवटी एका मैत्रिणीच्या सल्ल्यावरून आणि आग्रहाखातर ती एका प्रसिद्ध कॉस्मेटिक क्लिनिकमध्ये गेली. या क्लिनिकचे संचालक डॉ. वू शाओहू हेदेखील या क्षेत्रातील एक जानंमानं नाव. त्यांना ‘लिपोसक्शनचे गाॅडफादर’ म्हटलं जातं.
‘लिपोसक्शन’ ही एक प्रकारची शस्त्रक्रिया आहे. विशेषतः ज्यांना आपलं वजन कमी करायचं आहे, त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया केली जाते. त्यासाठी पोट, मांड्या, नितंब, दंड, मान इत्यादी अवयवांमधील अतिरिक्त चरबी काढून टाकली जाते आणि वजन नियंत्रणात आणलं जातं. डॉ. वू शाओहू हे या क्षेत्रातले निष्णात तज्ज्ञ. संपूर्ण तैवानमध्ये याबद्दल त्यांची ख्याती आहे. त्यांच्याच क्लिनिकमध्ये त्या दिवशी काई उपचार घेत होती. निद्रानाशावर त्यांनी तिला ‘दुधाचं इंजेक्शन’ दिलं आणि ती कायमची निद्रेत गेली.
रिलॅक्स होण्यासाठी, झोप येण्यासाठी आणि शस्त्रक्रियेपूर्वी भूल देण्यासाठी वापरले जाणारे प्रोपोफोल इंजेक्शन म्हणजेच हे ‘दुधाचे इंजेक्शन’. ते वेदनाशामकही असते. रुग्णांना बेशुद्ध करण्यासाठी सर्वसाधारणपणे हे इंजेक्शन वापरले जाते. या द्रव्याचा रंग दुधासारखा असल्यानं त्याला ‘दुधाचं इंजेक्शन’ असं म्हटलं जातं. डॉ. वू शाओहू यांनी काईला हे इंजेक्शन दिलं आणि सारं काही सहायकावर सोपवून ते क्लिनिकमधून निघून गेले. संपूर्ण क्लिनिकमध्ये हा एकच सहायक होता आणि तोही अप्रशिक्षित. त्याच्याकडे कोणताही नर्सिंग परवानाही नव्हता.
एका अहवालानुसार डॉ. वू शाओहू क्लिनिकमधून बाहेर पडल्यानंतर आयव्ही सेटअपमध्ये काहीतरी गडबड झाली. ड्रिपचा वेग वाढला. त्यामुळे हे औषध अपेक्षेपेक्षा जास्त वेगानं काईच्या शरीरात प्रवेश करू लागलं. त्यानंतर लगेचंच तिला श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागला. काय करावं हे सहायकाला समजेना. त्यानं घाबरून डॉ. वू यांना फोन केला. व्हिडिओ काॅलवर डॉ. वू यांनी त्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात ते क्लिनिकमध्ये परतही आले. परंतु तोपर्यंत फारच उशीर झाला होता. काई चिरनिद्रेत गेली होती. तिचा श्वास थांबला होता आणि हृदयाची धडधडही थंडावली होती.. १८ दिवस ती कोमात होती. या प्रणालीचा उपयोग होण्याची शक्यता नाही असं डॉक्टरांनी सांगितल्यावर शेवटी तिच्या कुटुंबीयांनी जीवन तिची रक्षक प्रणाली काढण्याचा हृदयद्रावक निर्णय घेतला.