जर तुम्हाला गॅसची समस्या उद्भवत असेल काहीही खाल्ल्यानंतर पोट फुगत असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. ज्यामुळे गॅस होणं आणि पोट फुगण्याची समस्याही उद्भवणार नाही. यासाठी तुम्हाला कोणतंही औषध वापरावं लागणार नाही. स्वयंपाकघरातील २ पदार्थ वापरून तुम्ही गॅसच्या त्रासापासून आराम मिळवू शकता. (Mix These Two Spices Ajwain And black Salt to Get Immediate Relief From Gas And Bloting est Home Remedy)
प्रत्येकाच्याच स्वयंपाकघरात ओवा आणि काळं मीठ असतंच. हे दोन्ही पदार्थ मिसळून प्यायल्यानं पोटातील गॅस सहज बाहेर पडण्यास मदत होते. हे दोन्ही पदार्थ एकत्र करून खाल्ल्यानं पोटातील गॅसेसच्या त्रासापासून आराम मिळतो. फुगलेलं पोट लवकर आत जातं. ओवा आणि काळ्या मिठाचं सेवन कसं करायचं पाहूया.
गॅस, पोट फुगण्याच्या समस्येवर ओवा आणि काळं मीठ परिणामकारक
यासाठी ओवा तव्यावर भाजून घ्या. तुम्ही न भाजतासुद्धा ओवा घेऊ शकता. ओवा थोडा जाडसर वाटून घ्या. जवळपास २ चमचे ओव्यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ घाला. हा उपाय तुम्हाला गॅस, एसिडीट, ढेकर येणं, पोट फुगण्याच्या समस्येवर आराम देईल. ओवा चावून खा. या पद्धतीनं ओव्याचं सेवन केलं तर गॅसेसची समस्या टाळता येते.
ओवा खाण्याचे फायदे
ओवा पोटासाठी फायदेशीर ठरतो. ओवा खाल्ल्यानं गॅसेस, पोट फुगण्याच्या त्रासापासून आराम मिळतो. आंबट ढेकर येणं कमी होतं. अन्नाचं पचन व्यवस्थित होण्यासाठी ओवा गुणकारी ठरतो. तर तुम्हाला पोटाच्या समस्या उद्भवत असतील तर ओवा खाल्ल्यानं त्वरीत आराम मिळेल. ओव्याचं पाणी मिसळून प्यायल्यानं मेटाबॉलिझ्म वेगानं वाढतं आणि वजन कमी होतं.
ओवा- काळं मीठ खाण्याचे फायदे
काळं मीठ पोटासाठी फायदेशीर मानले जाते. यात पचनासंबंधी गुण असतात ते पित्त उत्पादन उत्तेजित करून अन्नाचं पचन करण्यास मदत करते. काळं मीठ ओव्यासोबत खाल्ल्यानं पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. काळ्या मिठात बरेच मिनरल्स असतात. काळं मीठ खाल्ल्यानं पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. काळं मीठ गॅसेसची समस्या दूर करते तसंच छातीत जळजळही होत नाही.
