Join us

गव्हाच्या कणकेत 'हा' पदार्थ कालवून चपाती खा-व्हिटामीन B-12, D भरपूर मिळेल-फिट राहाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 08:01 IST

Bottle Gourd And Spinach In Wheat Chapati Will Improve Vitamin B-12 : व्हिटामीन बी-१२ आणि व्हिटामीन डी च्या कमतरतेची अनेक कारणं असू शकतात.

शरीरातील पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. व्हिटामीन बी-१२ आणि व्हिटामीन डी असे दोन्ही व्हिटामीन्सच्या कमतरता वळपास १० पैकी ८ लोक लोकांना उद्भवत आहे. या व्हिटामीन्सच्या कमतरतेमुळे शरीरात थकवा, सांधेदुखी, स्मरणशक्ती कमी होणं, झोप यायला त्रास होणं अशा समस्या उद्भवतात आणि इम्युनिटी कमी होते. (Vitamin B-12)

व्हिटामीन बी-१२ आणि व्हिटामीन डी च्या कमतरतेची अनेक कारणं असू शकतात. व्हिटामीन बी-१२ मुख्यत्वे मांसाहारी अन्नातून मिळते. शरीर व्हिटामीन बी-१२ स्वत: तयार करत नाही. म्हणूनच डाएट किंवा सप्लिमेंट्सद्वारे मिळवणं गरजेचं आहे. (Mix Bottle Gourd And Spinach In Wheat Chapati Will Improve Vitamin  B-12 And Vitamin D)

व्हिटामीन डी मुख्य स्वरूपात सूर्याच्या किरणांपासून मिळते. याव्यतिरिक्त फोर्टिफाईड फूडमधूनही व्हिटामीन डी मळते. व्हिटामीन डी मुळे हाडं आणि दात मजबूत राहण्यास मदत होते. ज्यामुळे इम्यून सिस्टीम चांगली राहते आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासही मदत होते.

व्हिटामीन डी च्या कमतरतेची लक्षणं

व्हिटामीन डी च्या कमतरतेमुळे हाडांमध्ये वेदना, कमकुवतपणा, थकवा, मांसपेशींमध्ये वेदना, स्ट्रोक, हृदयरोगाचा धोका उद्भवतो. इम्यून सिस्टिम कमजोर होते मूडमध्ये बदल होतो.

व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेची लक्षणं

थकवा, कमकुवतपणा, डोकेदुखी, चक्कर येणं, हात-पाय सुन्न पडणं, रक्ताची कमतरता किंवा श्वास घ्यायला त्रास उद्भवतो. रक्ताची कमतरता भासते आणि श्वास घ्यायला त्रास होतो. तोंड आणि जिभेतही त्रास होतो.

न्युट्रिशनिस्ट आणि डाएट एक्सपर्ट्स संदिप गुप्ता सांगतात की शरीरात या २ व्हिटामीन्सची भरपाई करण्यासाठी गव्हाच्या पिठात २ भाज्या मिसळा. व्हिटामीन बी-१२ आणि व्हिटामीन डी ची कमतरता पूर्ण करण्यासाठी पालक, दुधी मिक्सरमध्ये घालून वाटून घ्या. गव्हाची कणीक मळताना त्यात दूधी आणि पालकाची पेस्ट घाला. २ चमचे दही आणि चवीनुसार मीठ मिसळा. नंतर या कणकेची चपाती करा.

गव्हात दूधी, पालक आणि दही मिसळून केल्यानं चपाती अधिक पौष्टीक होते. पीठ मळून ठेवल्यानं त्यातील भाज्यांतील पोषक घटकही त्यात उतरतात. फर्मेंटेड फूडमध्ये गुड बॅक्टेरियाज असतात. ज्यामुळे व्हिटामीन बी-१२ तयार करण्यास मदत होते. ज्यामुळे शरीरातील गुड बॅक्टेरियाजना पोषण मिळते. फर्मेंटेड पिठाची चपाती खाल्ल्यानं फक्त व्हिटामीन बी-१२ ची कमतरता पूर्ण होत नाही तर ही चपाती खायलाही उत्तम लागते. ज्यातून शरीराला फक्त पोषण मिळत नाही तर व्हिटामीन डी ची कमतरतासुद्धा भरून निघते.

English
हिंदी सारांश
Web Title : Boost Vitamin B-12, D: Mix This in Wheat Dough!

Web Summary : Address vitamin deficiencies by adding bottle gourd and spinach paste to wheat dough. This enhances nutrient absorption and promotes gut health, providing Vitamin B-12 and Vitamin D.
टॅग्स : लाइफस्टाइलहेल्थ टिप्सआरोग्य