Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मेडिकल सायन्सचा चमत्कार! नव्या IVF टेक्निकने पालक ठरवणार मुलाच्या डोळ्यांचा-त्वचेचा रंग

मेडिकल सायन्सचा चमत्कार! नव्या IVF टेक्निकने पालक ठरवणार मुलाच्या डोळ्यांचा-त्वचेचा रंग

पालकांसाठी आता खूशखबर आहे. विज्ञानाने चमत्कार केला असून पालक आता त्यांच्या मुलांच्या डोळ्यांचा रंग, केसांचा रंग आणि मुलाच्या त्वचेचा रंग देखील ठरवू शकणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 12:23 IST2025-06-07T12:20:27+5:302025-06-07T12:23:45+5:30

पालकांसाठी आता खूशखबर आहे. विज्ञानाने चमत्कार केला असून पालक आता त्यांच्या मुलांच्या डोळ्यांचा रंग, केसांचा रंग आणि मुलाच्या त्वचेचा रंग देखील ठरवू शकणार आहेत.

miracle of medical science new ivf technology allows parents to decide how their child will look | मेडिकल सायन्सचा चमत्कार! नव्या IVF टेक्निकने पालक ठरवणार मुलाच्या डोळ्यांचा-त्वचेचा रंग

मेडिकल सायन्सचा चमत्कार! नव्या IVF टेक्निकने पालक ठरवणार मुलाच्या डोळ्यांचा-त्वचेचा रंग

आजच्या युगात विज्ञानाने मानवी जीवन सोपं करण्यासोबतच अनेक आश्चर्याचे धक्के दिले आहेत. मुलांचा विचार करणाऱ्या पालकांसाठी आता खूशखबर आहे. विज्ञानाने चमत्कार केला असून पालक आता त्यांच्या मुलांच्या डोळ्यांचा रंग, केसांचा रंग आणि मुलाच्या त्वचेचा रंग देखील ठरवू शकणार आहेत. न्यूक्लियस जेनोमिक्स या अमेरिकन जीनोमिक्स कंपनीने आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे एक सॉफ्टवेअर विकसित केलं आहे, जे मुलांचे जीन ऑप्टिमाइझ करू शकतात.

आतापर्यंत आयव्हीएफ लॅबमध्ये  एग आणि स्पर्म फर्टिलाइझ करून महिलेच्या गर्भाशयात दिलं जातं. परंतु न्यूक्लियस जेनोमिक्सने एक पाऊल पुढे जाऊन 'न्यूक्लियस एम्ब्रियो' नावाचं जेनिटिक ऑप्टिमायझेशन सॉफ्टवेअर विकसित केलं आहे, जे गर्भाच्या डीएनएचं विश्लेषण करून ९०० हून अधिक रोगांची शक्यता तपासू शकतं. यामध्ये डायबेटिस, हार्ट डिसीज, कॅन्सर यासारखे गंभीर आजार समाविष्ट आहेत.

केवळ आजारच नाही तर हे तंत्रज्ञान गर्भातील आयक्यूशी संबंधित मार्कर्स, डिप्रेशन, एंग्जायटी , बीएमआय आणि उंची याच्यासह मानसिक स्थितींबद्दल देखील माहिती देतं. इतकंच नाही तर पालक आता मुलांच्या केसांचा रंग, डोळ्यांचा रंग आणि त्वचेचा रंग यासारखे वैशिष्ट्य निवडू शकतात.

जर तुम्ही आयव्हीएफद्वारे बाळाचं नियोजन करत असाल तर तुम्ही तुमच्या क्लिनिकमधून डीएनए डेटा अपलोड करू शकता. सॉफ्टवेअर त्यांचं विश्लेषण करेल आणि नंतर तपशीलवार अहवाल देईल, जेणेकरून पालक त्यांच्यासाठी काय 'सर्वोत्तम' आहे हे ठरवू शकतील. जरी हे तंत्रज्ञान मेडिकल सायन्समध्ये एक मोठी झेप मानलं जात असलं तरी, त्याशी संबंधित अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत.


 

Web Title: miracle of medical science new ivf technology allows parents to decide how their child will look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.