Join us

हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 13:48 IST

आपल्याला हेल्दी वाटणारा मिल्कशेक देखील तुमच्या मेंदूचं मोठं नुकसान करू शकतो.

निरोगी राहण्यासाठी योग्य आहार खूप महत्त्वाचा आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, की तुम्ही अधूनमधून जंक फूड खाल्लं तर त्याचा तुमच्या मेंदूवर खूप वाईट परिणाम होतो. हे अशा लोकांसोबत जास्त घडतं जे फिटनेसचे चाहते आहेत आणि आठवड्यातून एकदा चीट डे साजरा करतात. आपल्याला हेल्दी वाटणारा मिल्कशेक देखील तुमच्या मेंदूचं मोठं नुकसान करू शकतो. एका रिसर्चमध्ये असं आढळून आलं आहे की, मिल्कशेकसारख्या हाय फॅट गोष्टी मेंदूपर्यंत पोहोचणाऱ्या रक्तप्रवाहावर परिणाम करू शकतात. यामुळे स्ट्रोक आणि डिमेंशिया सारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. द जर्नल ऑफ न्यूट्रिशनल फिजियोलॉजीमध्ये हा रिसर्च प्रकाशित झाला आहे.

आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी फॅट आवश्यक आहे. फॅटचे दोन प्रकार आहेत - सॅच्युरेटेड फॅट आणि अनसॅच्युरेटेड फॅट. त्यांचं केमिकल कम्पोजिशन वेगवेगळी असतात आणि शरीरावर त्याचे परिणाम देखील वेगवेगळे असतात. या नवीन रिसर्चमध्ये असं आढळून आलं आहे की, मिल्कशेक किंवा तळलेले अन्न यासारखे हाय फॅट पदार्थ शरीरावर त्वरित वाईट परिणाम करू शकतात. ते रक्तवाहिन्यांच्या आकुंचन क्षमतेवर परिणाम करतात जे हृदय आणि मेंदू दोघांसाठीही धोकादायक ठरू शकतात.

रिसर्चमध्ये पुरुषांच्या दोन गटांचा अभ्यास करण्यात आला. एक १८-३५ वयोगटातील आणि दुसरा ६०-८० वयोगटातील. त्यांना हाय फॅटवालं अन्न देण्यात आलं, विशेषतः मिल्कशेक, ज्याला 'ब्रेन बॉम्ब' म्हटलं जातं कारण त्यात भरपूर व्हिपिंग क्रीम असते. हे पेय सुमारे १३६२ कॅलरीज आणि १३० ग्रॅम फॅटने भरलेलं होतं, जे फास्ट फूडच्या बरोबरीचे होतं.

निकालांवरून असं दिसून येतं की, हाय फॅट अन्न हृदयाशी जोडलेल्या रक्तवाहिन्यांची उघडण्याची क्षमता कमी करतं, ज्यामुळे मेंदूचा रक्तपुरवठा प्रभावित होतो. वृद्धांमध्ये हा परिणाम सुमारे १०% जास्त होता, जे स्पष्टपणे दर्शवते की वृद्धापकाळात मेंदू अशा अन्नाच्या परिणामांबद्दल अधिक संवेदनशील बनतो. संशोधकांनी सांगितलं की, सॅच्युरेटेड फॅट असलेलं अन्न खाल्ल्याने केवळ हृदयाचं आरोग्य धोक्यात येतं असं नाही तर मेंदूवरही परिणाम होतो. वृद्धांनी अशा गोष्टी टाळणं महत्त्वाचं आहे. 

एक किंवा दोनदा हाय फॅट पदार्थ खाल्ल्याने तुमचं लगेचच मोठं नुकसान होत नसलं तरी त्याचं सेवन कमीत कमी करणं फायदेशीर आहे. म्हणूनच तुमच्या दैनंदिन आहारात संतुलन राखणं आणि सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण कमी करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. योग्य आहारानेच आपण हृदय आणि मेंदू दोन्ही निरोगी ठेवू शकतो हे कायम लक्षात ठेवा.

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स