Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > प्रिया मराठेने अकाली घेतला निरोप, ऐन तारुण्यात महिलांमध्ये का वाढतोय कॅन्सरचा धोका- काळजी घ्या..

प्रिया मराठेने अकाली घेतला निरोप, ऐन तारुण्यात महिलांमध्ये का वाढतोय कॅन्सरचा धोका- काळजी घ्या..

Priya Marathe news: Cancer risk in young women: Cancer risk in young women: ध्या ३५ ते ४० वर्षानंतर महिलांमध्ये कर्करोगाचा धोका वाढतो आहे, कारण काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2025 14:03 IST2025-09-01T13:56:03+5:302025-09-01T14:03:17+5:30

Priya Marathe news: Cancer risk in young women: Cancer risk in young women: ध्या ३५ ते ४० वर्षानंतर महिलांमध्ये कर्करोगाचा धोका वाढतो आहे, कारण काय?

marathi actress Priya Marathe death in age 38s news Why cancer risk is increasing among young women How to prevent cancer in women in their 20s and 30s | प्रिया मराठेने अकाली घेतला निरोप, ऐन तारुण्यात महिलांमध्ये का वाढतोय कॅन्सरचा धोका- काळजी घ्या..

प्रिया मराठेने अकाली घेतला निरोप, ऐन तारुण्यात महिलांमध्ये का वाढतोय कॅन्सरचा धोका- काळजी घ्या..

पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री प्रिया मराठेच वयाच्या ३८ व्या वर्षी कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने निधन झालं.(Priya Marathe news) मागच्या काही काळापासून ती कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढा दिला. अवघ्या वयाच्या ३८ व्या वर्षी निधन झाल्यामुळे सिनेसृष्टीसह अनेकांनी हळहळ व्यक्त केली.(Cancer risk in young women) 
पण कॅन्सर हा आजार अजूनही जगभरातील मृत्यूचं एक प्रमुख कारण आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार दरवर्षी २ कोटीपेक्षाही जास्त लोकांना कॅन्सरचे निदान होते.(Health tips for women) अवघ्या कमी वयातच कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला महिलांना सामोरे जावे लागत आहे. सध्या ३५ ते ४० वर्षानंतर महिलांमध्ये कर्करोगाचा धोका वाढतो आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक महिलेने सावधगिरी बाळगणे खूप महत्त्वाचे आहे.(Cancer awareness) तसेच काही लक्षणं दिसताच वेळेवर चाचणी करायला हवी. वाढत्या वयात महिलांमध्ये कर्करोगाची तीन सामान्य लक्षणे दिसून येतात. (Women’s health care)

घरातल्या टॉयलेट सीटवर काळे- पिवळे डाग पडले? चमचाभर कॉफी पावडर करेल कमाल- खसाखसा न घासताही टॉयलेट सीट चमकेल

1. स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. तो स्तनांच्या ऊतींमध्ये होतो. यामध्ये स्तनाच्या पेशी अनियंत्रितपणे वाढतात आणि ट्यूमर तयार करतात. हा कॅन्सर कोणत्याही वयात होऊ शकतो. परंतु, वयानुसार धोका वाढतो. नियमित तपासणी केल्यास वेळीच उपचार करता येतात. बहुतेक लोकांमध्ये स्तनाचा कर्करोग हा सुरुवातीच्या लक्षणांपासून दाखवत नाही. पण स्तनात वेदना होणाऱ्या गाठी, स्तनाच्या आकारामध्ये बदल, स्तनांमध्ये जळजळ किंवा आग होणे, स्तनांमधून रक्त येणे, त्वचेला खाज सुटणे किंवा लालसरपणा दिसतो. 

2. महिलांमध्ये कोलन कर्करोग देखील अतिशय सामान्य आहे. त्याला कोलोरेक्टल कर्करोग असं देखील म्हटलं जातं. या कर्करोगाचा धोका बैठी जीवनशैली, वाढते वजन, धूम्रपान, मद्यपान, लाल मांस किंवा अनुवांशिकता यामुळे जास्त प्रमाणात वाढतो. त्यामुळे वयाच्या ३० व्या वर्षी चाचणी करायला हवी. यामध्ये वारंवार अतिसार किंवा बद्धकोष्ठता, मलमधून रक्त येणे, अशक्तपणा किंवा थकवा जाणवणे, पोटाच्या भागात सतत अस्वस्थता, जसे की पेटके, गॅस किंवा वेदना. सतत वजन कमी होणे यांसारखी लक्षणे दिसतात. 

3. गर्भाशयाचा कर्करोग हा जागतिक स्तरावरील महिलांमध्ये चौथा सामान्य कर्करोग आहे. HPV हा एक सामान्य संसर्ग आहे. हा असुरक्षित लैंगिंक संबंध, मासिक पाळीची अस्वच्छता आणि संक्रमित अवयव, त्वचेच्या संपर्कातून पसरतात. या कर्करोगाची चाचणी वयाच्या २५ व्या वर्षापासून केली जाते. लैंगिक संबंधानंतर योनीतून रक्तस्त्राव रजोनिवृत्तीनंतर योनीतून रक्तस्त्राव, लघवीच्या ठिकाणाहून रक्त किंवा तीव्र वास येणे, लैंगिक संबंधानंतर ओटीपोटीत वेदना, मासिक पाळीदरम्यान असामान्य रक्तस्त्राव, लघवी करताना अडचणी किंवा वेदना, पायांना सूज येणे, पोटदुखी, थकवा यांसारखी लक्षणे दिसतात. त्यासाठी वेळीच काळजी घ्यायला हवी. 
 

Web Title: marathi actress Priya Marathe death in age 38s news Why cancer risk is increasing among young women How to prevent cancer in women in their 20s and 30s

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.