How to Avoid Malaria: उन्हाळ्यात डास वाढले की मलेरियाचा धोकाही जास्त वाढतो. डासांसाठी उष्ण वातावरण हे पुरक असतं. त्यामुळे उन्हाळ्यात घराघरात डासांनी हैदोस घातलेला असतो. रात्री झोपेचं खोबरं करण्याचं काम डास करतात. सोबतच आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्याही होतात. त्यातील एक म्हणजे मलेरिया. जर वेळीच यावर उपचार केले नाही तर जीवालाही धोका होऊ शकतो. अशात आज आम्ही या आजारांपासून वाचण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. ही आयुर्वेदिक औषधं तुम्ही घरीच तयार करू शकता.
मलेरिया दूर करण्याचे घरगुती उपाय
आल्याचा रस
आयुर्वेदाच्या जाणकारांनुसार, जास्त ताप आल्यावर तुम्ही एक चमका आल्याचा रसही सेवन करू शकता. यात अॅंटी इंफ्लेमेटरी आणि अॅंटी बॅक्टेरिअल गुण असतात. हा रस प्यायल्यानं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच सोबतच ताप आणणाऱ्या व्हायरसचाही अंत होतो.
गुळवेलाचा काढा
शरीरात मुरलेला ताप पळवून लावण्यासाठी तुम्ही गुळवेलच्या काढ्याचं सेवन करू शकता. यातही अॅंटी पायरेटिक आणि अॅंटी इंफ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे यानं डेंग्यू-मलेरियापासून बचाव होतो. तसेच रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
तुळशीच्या पानांचा रस
तुळशीची पाने आयुर्वेदिक गुणांचा खजिना आहे. या पानांमध्ये डायफोरेटिक आणि अॅंटी-पायरेटिक गुण आढळतात. या पानांच्या सेवनाने शरीरातील घाम वेगाने बाहेर निघतो, ज्यामुळे शरीराचं तापमान कमी होतं व ताप उतरतो.
कडूलिंबाची पानं
डेंग्यू-मलेरियासोबत लढण्यासाठी कडूलिंबाच्या पानांचं सेवन करावं. या पानांमध्ये व्हायरस आणि बॅक्टेरिया नष्ट करण्याचे गुण असतात. या पानांचं सेवन केलं तर मलेरिया, ताप, डेंग्यू आणि फ्लू सारख्या आजारांपासून बचाव करता येतो. पण स्थिती गंभीर असेल तर डॉक्टरांशी संपर्क करा.
दालचीनीचा काढा
मलेरिया-डेंग्यूने पीडित झाल्यावर रूग्ण दालचीनीचा काढा घेऊ शकतात. हा काढा चांगला मानला जातो. आयुर्वेदात याला तापावर चांगलं औषध मानलं आहे. जर तुम्हाला हा काढा कडवत लागत असेल तर त्यात थोडं मध टाकू शकता. पण हा काढा घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.