Malaria symptoms : पावसाळा आला की, डेंग्यू, डायरियासोबतच मलेरियाचा धोका खूप वाढतो. मलेरिया हा एक जीवघेणा आजार असून यावर वेळीच उपचार केले पाहिजे. दिल्लीमध्ये मलेरियाच्या केसेस खूप वाढल्याचं आढळून आलं आहे. पाऊस जास्त झाला की, साचलेल्या पाण्यात डासांचं प्रमाण वाढतं. त्यामुळे डासांपासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे उपाय करणं गरजेचं ठरतं. मलेरिया झाल्याची वेगवेगळी लक्षणं शरीरात दिसतात. त्यात आता तर एक नवीनच लक्षण समोर आलं आहे.
दिल्लीमध्ये मलेरियासोबतच डेंग्यूच्या केसेस देखील वाढल्या आहे. एका आकडेवारीनुसार, २८ जुलैपर्यंत २७७ केसेसची नोंद झाली आहे. ही आकडेवारी गेल्या ५ वर्षातील सगळ्यात जास्त आहे.
वेळीच उपचार महत्वाचा
मलेरियाची झाल्याची माहिती जर वेळेत मिळाली तर यावर उपचार प्रभावीपणे करता येतो. जर उपचार करायला वेळ झाला तर जीवही जाऊ शकतो. महत्वाची बाब म्हणजे हा आजार पसरण्यापासून रोखणंही तेवढंच महत्वाचं आहे.
मलेरियाची लक्षणं
NCVBDC नं मलेरियाची लक्षणं सांगितली आहेत. ज्यात एक लक्षण कानासंबंधी आहे. ताप, नाकातून पाणी येणे, खोकला, रेस्पिरेटरी इन्फेक्शन, डायरिया, पोटदुखी, स्किन रॅशेज, जॉइंट्समध्ये वेदना, कानातून पाणी येणे इत्याही लक्षणं सांगता येतील.
बचावाचे उपाय
मलेरियापासून बचाव करण्यासाठी डासांना दूर ठेवलं पाहिजे. हाच यावरील बेस्ट उपाय आहे. त्यामुळे डास पळवण्यासाठी स्किन क्रीम लावा, शरीर पूर्ण झाकलं जाईल असे कपडे वापरा, बेडरूममध्ये मच्छरदानी लावा, डास पळवणाऱ्या कॉइल, अगरबत्ती लावा, मोकळ्या जागेत पाणी साचू देऊ नका. कुंड्या, भांड्यांमध्ये पाणी साचू देऊ नका. कूलरमधील पाणीही बदला. हे उपाय करून मलेरियापासून बचाव केला जाऊ शकतो.