Join us

कंबर, गुडघे खूप दुखतात? मूठभर मखाने 'या' पद्धतीनं खा, पोलादी होतील हाडं-ताकद येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 08:50 IST

Makhana Makes Bones Strong And Also Reduce Weight : यात कॅल्शियम, फॉस्फर,मॅग्नेशियम असे महत्वाचे घटक असतात.

मखाने (Makhana) एक असा सुपरफूड आहे जो फक्त स्वादीष्ट नसून तब्येतीच्या दृष्टीनं अनेक फायदे देतो. मखाने एक हलका फुलका स्नॅक्सचा पर्याय असून पोषक तत्वांचा खजिना आहे. खासकरून जेव्हा हाडं मजबूत करण्याचा विषय  असतो तेव्हा मखान्यांचा आहारात समावेश करायलाच हवा. यात कॅल्शियम, फॉस्फर,मॅग्नेशियम असे महत्वाचे घटक असतात. ज्यामुळे हाडांना आतून मजबूती मिळते. याव्यतिरिक्त यातील फायबर्स वजन कमी करण्यास मदत करतात. (Makhana Makes Bones Strong And Also Reduce Weight Know Right WayTo Consume It)

हाडं मजबूत बनवण्यासाठी उत्तम

हाडं मजबूत बनवण्यासाठी मखाने एक उत्तम सुपरफुड आहे. ज्यामुळे हाडांचे घनत्व वाढते आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या गंभीर आजारांपासून बचावास मदत होते. कॅल्शियमव्यतिरिक्त मखान्यांमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस,  प्रोटीन्स यांसारखी पोषक तत्व असतात जी हाडांना आतून मजबूत बनवतात.मखान्यात कमी कॅलरीज आणि जास्त फायबर असते ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं. यात  कॅलरीज कमी असल्यामुळे भूक कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म चांगला राहतो आणि वजन कमी होते.

मखाने खाण्याची योग्य पद्धत कोणती?

कढईत थोडे तूप किंवा ऑलिव्ह ऑइल गरम करा. त्यात मखाने घालून मंद आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. भाजलेल्या मखान्यांवर तुम्ही थोडे काळे मीठ, चाट मसाला किंवा जिरे पावडर टाकू शकता. यामुळे चव अधिक चांगली लागते. भाजलेले मखाने कमी कॅलरी असलेले स्नॅक आहेत. ते खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

दुधात मखाने शिजवून त्यात थोडे बदाम, पिस्ते आणि वेलची पावडर घालू शकता. मखान्याची खीर ऊर्जा देते आणि शरीराला आवश्यक पोषक तत्वे पुरवते. मखाने कमी कॅलरीचे असले तरी ते जास्त प्रमाणात खाऊ नये. एका दिवसात एक ते दोन वाटी मखाने खाणे पुरेसे आहे. तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर मीठ किंवा मसाले न घालता साधे भाजलेले मखाने खाणे उत्तम.मखाने हे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबरचा चांगला स्रोत आहेत. योग्य पद्धतीने खाल्ल्यास ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल