Kidney Stone Causes : कुणाच्याही किडनीमध्ये स्टोन होऊ शकतात. याची कारणंही प्रत्येकात वेगवेगळी असतात. पण मुख्यपणे चुकीची लाइफस्टाईल आणि अनहेल्दी डाएट यामुळे ही समस्या अलिकडे जास्त वाढली आहे. किडनीमध्ये स्टोन झाले तर असह्य वेदनांचा सामना करावा लागतो. लघवी करताना डोळ्यातून पाणी येईल इतक्या वेदना होतात. आपल्या माहितीसाठी किडनीमध्ये स्टोन कॅल्शिअम, ऑक्सालेट आणि यूरिक अॅसिडसारखे पदार्थ जमा झाल्यानं होतात. जर आपल्याला ही समस्या होऊ द्यायची नसेल तर याची कारणं आधी माहिती असली पाहिजेत, तिच पाहुयात...
सोडिअम-शुगरचं जास्त प्रमाण
जर आपण मीठ किंवा साखर वेगवेगळ्या माध्यमातून अधिक खात असाल तर आपल्याला किडनी स्टोनचा धोका अधिक होऊ शकतो. हेच कारण आहे की, डॉक्टर मीठ आणि साखर कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला देत असतात. तसेच या दोन्ही गोष्टी अधिक खाल्ल्यानं शरीरात इतरही आजारांचा धोका वाढतो.
कमी पाणी पिणं
आपण जर दिवसभर पुरेसं पाणी पित नसाल तर ही सवय महागात पडू शकते. कारण कमी पाणी प्यायल्यानं किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. जर किडनी स्टोनपासून बचाव करायचा असेल तर रोज भरपूर पाणी प्यावे. तसेच ज्यांच्या किडनीमध्ये आधीच स्टोन असेल तर त्यांनी स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावं.
हाय ऑक्सलेट फूड्स
शरीरात जास्त ऑक्सलेट गेल्यानं किडनीमध्ये स्टोन होतात. किडनीच्या या समस्येपासून बचाव करण्यासाठी ऑक्सलेट असलेले फूड्स कमी खावेत. त्याशिवाय प्रोटीनही योग्य प्रमाणात घ्यावं. पालक, बदाम, बीट यांमध्ये भरपूर प्रमाणात ऑक्सलेट असतं.