Disadvantages Of Hitting Snooze Alarm : अनेक एक्सपर्ट सांगतात की, दिवसाची सुरूवात जर चांगली झाली तर पूर्ण दिवस चांगला जातो. जर सकाळच काही चुकांनी केली तर पूर्ण दिवस मूड बिघडलेला राहतो. कामात लक्ष लागत नाही. माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) चे पती डॉक्टर श्रीराम नेने (Dr. Shriram Nene) हे सुद्धा या गोष्टीला दुजोरा देतात. डॉ. नेने यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी सांगितलं की, सकाळी अलार्म पुन्हा पुन्हा स्नूज करणं (Alarm Snooze) आरोग्यासाठी कसं नुकसानकारक ठरू शकतं. अलार्म स्नूज करणं सायलेंट किलरसारखं काम करतं. यानं शरीराचं एक नाही तर अनेक नुकसान होतात.
अलार्म स्नूज करण्याचे नुकसान
डॉ. श्रीराम नेने सांगतात की, जर सकाळी झोपेतून उठण्याचा कंटाळा येत असेल आणि पुन्हा पुन्हा अलार्म स्नूज करत असाल तर ही सकाळी केली गेलेली सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. अलार्म स्नूज केल्यानं गाढ झोप अचानक तुटते. तेच पुन्हा पुन्हा अलार्म स्नूज केल्यानं स्लीप एप्नियाची समस्या वाढू शकते. अशात पुन्हा पुन्हा अलार्म स्नूज करण्याऐवजी एक सिंगल अलार्मच लावला पाहिजे. सिंगल अलार्मनं झोपेतून चांगले उठू शकता आणि यानं व्यक्ती जास्त अलर्ट राहते.
फोन स्क्रोल करणं
तसेच सकाळी झोपेतून उठल्यावर आणखी काय करू नये याबाबतही डॉ. श्रीराम नेने यांनी माहिती दिली. ते सांगतात की, सकाळी झोपेतून उठल्यावर फोन स्क्रोल करू नये. झोपेतून उठल्यावर लगेच फोन बघत बसल्यानं डोपामाइन हार्मोन्स वाढतात. तसेच झोपेतून पूर्णपणे जागेही होत नाहीत. तुम्हाला स्ट्रेस किंवा लक्ष भरकटणे अशा समस्या होऊ शकतात. तसेच दिवसभर नकारात्मकता तुमच्या सोबत राहते. अशात सकाळी फोन बघू नये.
कॉफी पिणे
सकाळी केली जाणारी आणखी एक चूक म्हणजे कॉफी पिणे. बरेच लोक सकाळी झोपेतून उठल्या उठल्या कॉफीचा कप हातात घेतात. पण सकाळी उपाशीपोटी कॉफी प्यायल्यास यामुळे पोटात अॅसिड प्रोडक्शन सक्रिय होऊ शकतं. त्यामुळे सकाळी उपाशीपोटी कॉफी पिऊ नये.