Join us

मुलांना भूकच लागत नाही, तब्येत किडकिडीत? २ सोपे उपाय, मुलं आनंदाने जेवतील पोटभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2025 16:07 IST

Reasons For The Loss of Appetite in Children: बहुतांश आई लोकांची हीच तक्रार असते की त्यांच्या मुलांना भूकच लागत नाही. तुमचाही हाच अनुभव असेल तर मुलांची भूक वाढविण्यासाठी हे काही उपाय करून पाहा...(2 simple tips to Increase Your Childs Appetite Naturally)

ठळक मुद्दे मुलांची भूक नैसर्गिकपणे वाढून त्यांनी व्यवस्थित जेवावं यासाठी काय उपाय करता येतील?

उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मुलं दिवसभर घरी असतात. जेव्हा त्यांची शाळा, ट्यूशन नियमितपणे सुरू असते, तेव्हा त्यांचं खाण्यापिण्याचं एक व्यवस्थित रुटीन असतं. त्या वेळा बरोबर पाळल्या जातात. पण सुट्ट्या लागल्या की मुलं खाण्यापिण्याच्या बाबतीत मात्र अजिबात ऐकेनासे होतात. सकाळी उठण्याची वेळ बदलते. त्यामुळे आपोआपच मग इतर वेळाही बदलतात तशाच खाण्यापिण्याच्या वेळाही बदलतात. 'जेवून घे', 'जेवून घे' असं म्हणून आई अक्षरश: मुलांच्या मागे लागलेली असते. पण मुलांना मात्र अजिबात भूक नसते. पण त्याच वेळी मात्र काहीतरी यम्मी, काहीतरी वेगळं खावं असं मात्र नक्की वाटत असतं. अशावेळी प्रत्येक आईला प्रश्न पडतो की घरचं अन्न समोर आलं की भूक नसणारी मुलं बाहेरचे पदार्थ मात्र मिटक्या मारत खातात (Loss of Appetite in Children). तुमच्याही मुलांच्या बाबतीत असंच होत असेल तर हे काही घरगुती उपाय नक्की करून पाहा..(2 simple tips to Increase Your Childs Appetite Naturally)

मुलांना भूकच लागत नाही अशी तुमचीही तक्रार असते का?

 

मुलांची भूक नैसर्गिकपणे वाढून त्यांनी व्यवस्थित जेवावं यासाठी काय उपाय करता येतील याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ aarogyasevaofficial या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

अमेरिकन महिला मुलं घेऊन आली भारतात, म्हणाली मुलांचं बालपण भारतातच जायला हवं कारण..

यामध्ये त्यांनी दोन उपाय सांगितले आहेत. पहिला उपाय म्हणजे मुलांना दररोज नियमितपणे आवळा चूर्ण खाऊ घालणे. हा उपाय करण्यासाठी ५ ग्रॅम आवळा चूर्ण घ्या आणि ते मधामध्ये कालवून मुलांना खाऊ घाला. काही दिवस नियमितपणे हा उपाय केल्यास मुलांची भूक नैसर्गिकपणे वाढण्यास नक्कीच मदत होते, असं तज्ज्ञ सांगतात.

 

डॉक्टरांनी सांगितलेला दुसरा उपाय म्हणजे लिंबाचे लोणचे. आपल्याकडे तोंडाला चव नसल्यास लिंबाचे लोणचे खायला देतात. आजारी माणसालाही लिंबाचे लोणचे तोंडी लावायला द्यावे असे सांगितले जाते.

एक्सपर्ट सांगतात ९० टक्के लोक चुकीच्या पद्धतीने टरबूज खातात? पाहा तुमचंही चुकत नाही ना

लिंबाच्या छान मुरलेल्या लोणच्यामध्ये बरेच पाचक रस असतात ज्यामुळे पचनक्रिया आणि चयापचय क्रिया अधिक चांगली होते. त्याचाही मुलांच्या भुकेवर चांगला परिणाम दिसून येतो. त्यामुळे दिवसातून एकदा तरी मुलांना जेवणात लिंबाचे लोणचे तोंडी लावायला द्यावे. आणि मुख्य म्हणजे मुलांना लिंबाची मुरलेली फोड खाण्यास सांगावी. हे दोन उपाय केल्यास नक्कीच मुलांची भूक वाढून ते पोटभर जेवायला लागतील असं तज्ज्ञ सांगतात. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलहान मुलंअन्न