Join us   

Longevity Test : खुर्चीवर बसल्या बसल्या 'असं' ओळखा तुम्हाला किती आयुष्य मिळणार; तज्ज्ञांनी सांगितली सोपी चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2021 12:01 PM

Longevity Test : खुर्चीवर बसून तुम्ही तुमच्या म्हातारपणाकडे योग्य मार्गाने जात आहात की नाही हे कळू शकते. . याशिवाय तुम्ही किती दिवस जगू शकता हे देखील कळू शकते

प्रत्येक व्यक्तीला निरोगी, दीर्घायुष्य जगायचे असते. पण आजच्या काळात स्वत:ला निरोगी ठेवत दीर्घायुष्य जगणं काही सोपं नाही. त्यामुळेच जास्त जगण्यासाठी काय करावे असा प्रश्न अनेकदा लोक विचारताना दिसतात. या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आणि स्वतःला दीर्घायुष्य मिळवण्यासाठी शेल्डन कूपरने आपल्या आहारापासून ते व्यायामापर्यंत अनेक बदल केले.

The Big Bang Theory ही प्रसिद्ध मालिका प्रसिद्ध झाल्यानंतर, त्यांना आहार आणि आयुष्य वाढवणे यांच्यातील संबंध समजला. आपल्या सर्वांना माहित आहे की योग्य आहार केवळ तुम्हाला निरोगी ठेवत नाही. उलट तुम्ही दीर्घायुष्यही जगू शकता. अशा स्थितीत तुम्ही दीर्घायुष्य जगण्यासाठी काही प्रयत्न केले आहेत का? ब्रिटीश टेलिव्हिजन निर्माते डॉ. मायकल यांनी सुचवलेली पद्धत वापरून पाहू शकता.

चाचणी  करण्याची योग्य पद्धत

- सर्वप्रथम आर्म रेस्ट नसलेली खुर्ची घ्या

- आता या खुर्चीवर बसा

- मग बघा एका मिनिटात तुम्ही किती वेळा उभे आणि बसू शकता.

डॉ. मॉस्ले यांनी त्यांच्या आधीच्या एका लेखात या चाचणीबद्दल सांगितले आहे, ज्यामध्ये खुर्चीवर बसून तुम्ही तुमच्या म्हातारपणाकडे योग्य मार्गाने जात आहात की नाही हे कळू शकते. याशिवाय तुम्ही किती दिवस जगू शकता हे देखील कळू शकते. 1999 मध्ये आयोजित केलेल्या अभ्यासात 50 वर्षांवरील 2760 पुरुष आणि महिलांचा समावेश होता. असे आढळून आले की जे लोक एका मिनिटात 36 वेळा उठून बसू शकतात ते 13 वर्षे जास्त जगू शकतात. तुलनेनं त्याऐवजी जे एका मिनिटात फक्त 23 वेळा उठून बसू शकत होते ते कमी जगतात. ऐकायला थोडं विचित्र वाटत असलं तरी, एका पायावर उभं राहिल्याने तुम्ही किती निरोगी आहात हे कळतं. 

खुर्चीत बसणे आणि उभे राहण्याव्यतिरिक्त, संशोधनात असे दिसून आले आहे की एका पायावर उभे राहणे हे देखील सांगू शकते की तुम्ही किती निरोगी आहात आणि तुम्ही किती काळ जगू शकता. यामध्ये व्यक्तीला एका पायावर डोळे मिटून उभे राहावे लागते. या चाचणीतील निकलांनंतर सहभागींना 13 वर्षांनंतर कर्करोग किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असू शकतो, असाही अंदाज वर्तवण्यात आला होता.

गरोदरपणाचा धोका टाळण्यासाठी तरूणी सर्रास घेतात इमर्जन्सी पिल्स, हार्मोनल घोळ, तब्येतीचं वाटोळं

या परीक्षेत एका पायावर डोळे मिटून उभे राहून तुम्ही तुमच्या आयुष्याचा अंदाज अचूकपणे पाहू शकता याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच, तुम्ही ही चाचणी तीन वेळा करू शकता आणि त्याची सरासरी वेळ पाहून तुम्ही किती निरोगी आहात आणि तुम्ही किती काळ जगू शकता हे शोधू शकता.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर एखादी व्यक्ती या स्थितीत 10 सेकंद किंवा त्याहून अधिक काळ  उभी राहू शकते. तर त्या व्यक्तीचा पुढील 13 वर्षांत मृत्यू होण्याची शक्यता कमी असते. त्याऐवजी जे एका पायावर दोन सेकंद किंवा त्याहून कमी वेळही उभे राहू शकत नाहीत. त्यांना पुढच्या 13 वर्षात मृत्यूचा धोका जास्त असतो.

याशिवाय डॉ. मोस्ले यांनी हेही सांगितले आहे की, एखाद्या व्यक्तीच्या वयानंतर किती काळ एका पायावर डोळे बंद करून  उभे राहता हे योग्य आरोग्याचे लक्षण आहे. तुमचे वय 40 मध्ये असल्यास, तुमच्यासाठी 13 सेकंद उभे राहणे पुरेसे आहे. तर वयाच्या 50 वर्षांनंतर 8 सेकंद उभे राहणे पुरेसे आहे. त्याच वेळी, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी 4 सेकंद पुरेसे असतील.  

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइलतज्ज्ञांचा सल्ला